Homeचिट चॅटआशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत...

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत खानविलकरपुरस्कृत ३ मुंबईकर

जे बोलतो, ते करून दाखवतो असा लौकिक असलेले बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आज १४ ते १८ जूनदरम्यान अजमन, दुबई येथे होत असलेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचे नेतृत्त्व करत असलेल्या ३ मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंचा पूर्ण खर्च उचलत त्यांनी आपले क्रीडाकर्तव्य बजावत खेळाडूंना नवी उर्जा दिली आहे.

भारतीय शरीरसौष्ठवाचा कणा असलेल्या मुंबई शरीरसौष्ठवाला सर्वदृष्टीने बलशाली बनवण्याचे ध्येय साकारण्यासाठी अजय खानविलकर गेली अनेक वर्षे झटत आहेत. शरीरसौष्ठव हा खेळ सर्वसामान्यांचा आणि होतकरू मुलांचा आहे. शरीरसौष्ठवात मुंबईसारखी अफाट गुणवत्ता अवघ्या हिंदुस्थानात कुठेही नाही. पण जागतिक स्पर्धा म्हटली की आपले असंख्य खेळाडू प्रचंड खर्चाअभावी माघार घेतात आणि खरी गुणवत्ता मागेच राहते. या गुणवत्तेला पाठबळ देण्यासाठी, पुढे आणण्यासाठी त्यांनी मुंबई श्री स्पर्धेदरम्यान तीन खेळाडूंना आर्थिक पाठबळ देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी शरीरसौष्ठवपटू हरमित सिंग, संदीप सावळे आणि महिला शरीरसौष्ठवपटू रेखा शिंदे या तिघांचा पूर्ण खर्च उचलला आहे. यात विमानप्रवास, भोजन-निवास व्यवस्था आणि स्पर्धेची नोंदणी या सर्व गोष्टींचा समावेश आहे. आशियाई स्पर्धेसाठी या तीन खेळाडूंसह ज्युनियर शरीरसौष्ठवपटू समर्थ कोचले आणि मास्टर्स शरीरसौष्ठवपटू मनोज बोचरेही सहभागी होणार आहेत.

मदत नव्हे शरीरसौष्ठवाची परतफेड

खानविलकरांनी मुंबईपाठोपाठ राज्य संघटनेची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेकडो खेळाडूंना शरीराप्रमाणे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यानुसार ते खेळाडूंच्या नोकरीसह त्यांना पुरस्कर्ते मिळवून देण्यालाही आपले कर्तव्य मानत आहेत. जे काही आयुष्यात कमावलेय ते फक्त आणि फक्त शरीरसौष्ठवामुळेच. त्यामुळे या खेळासाठी आम्ही काही करतोय, ते उपकार नसून आमचे क्रीडाकर्तव्य आहे. खेळाने आमच्यावर जी उधळण केलीय, त्याची आमच्याकडून ही परतफेड असल्याचे खानविलकर म्हणाले. भविष्यातही या खेळासाठी हजारवेळा स्वतःच्या खिशात हात घालूच. पण समाजात असलेल्या दानशूरांच्या आणि कार्पोरेट कंपन्यांच्याही खिशात हात घालून खेळ आणि खेळाडूंसाठी उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

आशियाई स्पर्धेनिमित्त मुंबईच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपनगर संघटनेचे अध्यक्ष किटी फणसेका, सचिव राजेश सावंत, सुनील शेगडे, राकेश पांडे, राम नलावडे, किरण कुडाळकर, विजय झगडे, राजेश निकम, अशोक शेलार, जयदीप पवार, गिरीश कोटियन, नरेंद्र कदम तसेच शरीरसौष्ठवातील दिग्गज प्रवीण सकपाळ, उमेश गुप्ता उपस्थित होते.

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content