Homeटॉप स्टोरीकेशव उपाध्ये भाजपाचे...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे या सहा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून नवनाथ बन यांना नेमण्यात आले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. यावेळी 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस,12 चिटणीस, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, मुख्य प्रवक्ता तसेच पक्षाच्या विविध मोर्चाच्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. जुन्या आणि नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

उपाध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या कार्यकारिणीची घोषणा केल्याचेही ते म्हणाले. पाठोपाठ लागलेल्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कार्यकारिणीची घोषणा लांबणीवर पडली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपाध्ये

(पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी सोबत)

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content