Homeमुंबई स्पेशलन्या. देवेंद्र कुमार...

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती!

अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे आज झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, न्या. उपाध्याय यांचे कुटुंबिय, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवाधिकार आयुक्त न्या. के के तातेड, राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान, मुंबई व अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश व वकील उपस्थित होते.

सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी न्या. उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीत व राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा जन्म १६ जून १९६५ रोजी झाला. न्या. उपाध्याय यांनी १९९१ मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि ११ मे १९९१ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात नागरी आणि घटनात्मक बाजूने कामकाज पहिले. २१ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांना अतिरिक्त न्यायाधीशपदावर बढती मिळाली आणि ६ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची न्यायाधीशपदावर नियुक्ती करण्यात आली.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content