Homeएनसर्कलप्रजासत्ताकदिन संचलनात जम्मू-काश्मीर...

प्रजासत्ताकदिन संचलनात जम्मू-काश्मीर रायफल्स सर्वोत्तम

राजधानी दिल्लीत नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिन संचलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर करण्यात आले असून जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या संचलन पथकाला सर्वोत्तम पथकाचा मान देण्यात आला आहे.

सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल / इतर पूरक दलांचे संचलन पथके तसेच विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये / विभागांच्या चित्ररथांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांच्या तीन समित्या नेमण्यात आल्या होत्या. या समित्यांनी हे निकाल जाहीर केले.

सर्वोत्तम संचलन पथक: जम्मू आणि काश्मीर रायफल्स संचलन पथक

सर्वोत्तम संचलन पथक (सीएपीएफ/इतर पूरक दल): दिल्ली पोलीस संचलन पथक

सर्वोत्तम चित्ररथ (राज्ये/केंद्रशासित प्रदेश):

प्रथम क्रमांक– उत्तर प्रदेश_महाकुंभ 2025 – स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास

द्वितीय क्रमांक– त्रिपुरा_अनंत भक्ती: त्रिपुरातील 14 देवतांची पूजा – खर्ची पूजा

तृतीय क्रमांक– आंध्र प्रदेश_एतीकोप्पका बोम्मालू – पर्यावरणपूरक लाकडी खेळणी_  

सर्वोत्तम चित्ररथ (केंद्रीय मंत्रालये/विभाग)– आदिवासी कार्य मंत्रालय (जनजातीय गौरव वर्ष) 

विशेष पुरस्कार

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) – भारतीय राज्यघटनेच्या 75 वर्षांचा गौरव

‘जयति जय मम भारतम्’ नृत्य समूह

    ‘माय गव्हर्मेंट’ पोर्टलवरील लोकप्रियता मतदान निकाल– हे मतदान 26 ते 28 जानेवारीदरम्यान घेण्यात आले होते, जिथे नागरिकांना त्यांच्या आवडत्या चित्ररथांसाठी व संचलनासाठी पथकांसाठी मतदान करता आले.

    सर्वोत्तम संचलन पथक (सेवा)- सिग्नल्स आकस्मिक दल

    सर्वोत्तम संचलन पथक (सीएपीएफ/इतर पूरक दल)- सीएपीएफ संचलन पथक

    लोकप्रियता मतदानानुसार सर्वोत्तम चित्ररथ (राज्ये/केंद्रशासित प्रदेश):

    प्रथम क्रमांक– गुजरात (स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास)

    द्वितीय क्रमांक– उत्तर प्रदेश (महाकुंभ 2025 – स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास)

    तृतीय क्रमांक– उत्तराखंड (उत्तराखंड: सांस्कृतिक वारसा आणि साहसी क्रीडा)

    लोकप्रियता मतदानानुसार सर्वोत्तम चित्ररथ (केंद्रीय मंत्रालये/विभाग)-

    महिला आणि बालविकास मंत्रालय (महिला व मुलांच्या बहुआयामी प्रगतीचा प्रवास, मंत्रालयाच्या सर्वसमावेशक योजनांद्वारे पोषित हा संचलन सोहळा भारतीय संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेच्या समन्वयाचा भव्य उत्सव होता.)

    Continue reading

    धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

    मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

    आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

    काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

    १ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

    येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
    Skip to content