Tuesday, February 4, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजऑलिम्पिक ज्योतीतली आग...

ऑलिम्पिक ज्योतीतली आग खरी आहे का?

या वर्षीचे ऑलिम्पिक सामने सुरु झाले त्या दिवशी धावपटू मेरी जोस पेरेक आणि ज्युडो खेळाडू टेडी रायनर या फ्रेंच खेळाडूंनी प्रचंड आकाराची ऑलिम्पिक ज्योत पेटवली होती. संपूर्ण पॅरिस शहरातून २३ फूट उंच अशी ही ज्योत दिसत होती. ही ज्योत एका प्रचंड आकाराच्या फुग्याला जोडलेली असून ती दररोज रात्री हवेत २०० फूट उंच अशी तेवत असते. संपूर्ण पॅरिस शहरातून दिसणारी ही ज्योत बघण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. पण गम्मत अशी आहे की या ज्योतीमध्ये आग मात्र नाही. त्यामुळे कोणताही धोका असण्याचे कारण नाही.

ही आकाशातील ज्योत पाण्याचा अतिशय सूक्ष्म असा फवारा आणि प्रकाश यांचा उपयोग करून तयार केली आहे. त्यामुळे ती भ्रामक असली तरी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची त्यामधून कमाल दिसते. खऱ्या ज्योतीऐवजी ऑलिम्पिकमधील प्रचंड कढईमधली ही भ्रामक ज्योती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच बघायला मिळते आहे. या निर्मितीसाठी पाण्याचे २०० फवारे आणि ४० एलइडी दिवे यांचा उपयोग ज्योतीची लाव अथवा थरथर दाखवण्यासाठी केला गेला आहे. यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये ही ज्योत खरी असायची.

ऑलिम्पिक

ऑलिम्पिक चार वर्षांनी एकदा का?

ऑलिम्पिक चार वर्षांनी एकदा का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला प्राचीन ग्रीक दिनदर्शिका बघावी लागेल. ऑलिम्पिक पदकांसाठी किमान चार वर्षांची उत्तम कामगिरी आणि त्यानंतर स्पर्धेत तशीच सर्वोत्तम कामगिरी हे पदकाचे निकष असतात. पण एकदा ऑलिम्पिक वर्ष गेले की पुन्हा चार वर्षे वाट बघताना खेळाडूचे वय वाढत असते आणि त्याची कामगिरी कायम ठेवणे त्याला तरुण वयापेक्षा निश्चितच कठीण असणार यात शंका नाही. राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे म्हणणे असे आहे की, प्राचीन ग्रीसमध्ये कालगणना ही चार वर्षांच्या मानकानुसार होत असे. या काळाला ऑलिम्पियाड असे म्हणत. या प्राचीन दिनदर्शिकेचा सन्मान म्हणून ऑलिम्पिक स्पर्धा आज दर चार वर्षांनी होतात.

ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या डब्यात असते तरी काय?

ऑलिम्पिक पदक विजेता समारंभ संपल्यानंतर प्रत्येक विजेत्या खेळाडूला एका भलामोठा कार्डबोर्ड डबा दिला जातो. यात काय असते याबद्दल आपल्या मनात नक्कीच कुतूहल असणार. यात मिळालेले पदक सांभाळून ठेवण्यासाठी काहीतरी असेल असे तुम्हाला वाटून जाईल. पण लक्षात घ्या की, या कार्डबोर्डच्या डब्यात एक अतिशय सुंदर असे २०२४ परिस ऑलिम्पिक खेळांचे पोस्टर असते. गंमतीची बाब अशी की हे पोस्टर खेळांच्या ठिकाणी काहीशे रुपयांना उपलब्धसुद्धा केले जाते.

ऑलिम्पिक

ऑलिम्पिकमधील धावपट्टी जांभळी का?

ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणाऱ्या देशाला मिळणारा एक अलभ्य लाभ असा असतो की, यात तो डिझाईन आणि सौंदर्य याबाबतीत स्वत:ची खास कामगिरी दाखवू शकतो. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये फ्रान्स देशाला हा सन्मान मिळाला आणि त्यांनी आपल्या परीने अतिशय देखणी स्पर्धा आयोजित केली आहे. रंगीबेरंगी ऑलिम्पिकमध्ये यावर्षी निळा, लाल, हिरवा आणि जांभळा अशा रंगांची रेलचेल आहे. हे रंग संपूर्ण फ्रान्समध्ये स्पर्धा सुरु असलेल्या जागी आपल्याला दिसतात. आणि यातच धावपटूसाठी धावपट्टी तयार करताना आयोजकांनी कमाल केली आहे. यासाठी त्यांनी रंग तर जांभळा घेतला आहेच, पण ही पट्टी मध्य पूर्वेत आढळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यांची भुकटी टाकून तयार केली गेली आहे. मोन्डो नावाच्या इटालियन कंपनीने ही धावपट्टी निर्माण केली असून त्यांच्या मते यावर धावताना धावपटूला काहीशी अधिक उसळी मिळू शकेल. अशी धावपट्टी ही बहुधा प्रथमच तयार केली गेली असावी.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

सावधान! स्मृतिभ्रंश होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय!!

केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक संपन्न देशांमध्ये स्मृतिभ्रंश होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. यातच या रोगाविषयी तज्ज्ञांचे मत असे आहे की, अशा लोकांची संख्या आता वाढतच जाणार आहे. अत्यंत प्रगत मानल्या जाणाऱ्या एका देशात या रोगाने ग्रस्त लोकांची...

कृत्रिम बुद्धिमत्ता नाही तर माणूसच पळवणार आपल्या नोकऱ्या..

नवीन वर्षात आणि त्यानंतर होणार असलेल्या बदलांबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत. याच वर्षीच्या सुरुवातीला अनेक विज्ञान नियतकालिकांनी २०२५मध्ये काय-काय होऊ शकते याचे भविष्य मांडले. त्यातली सर्वात महत्त्वाची आणि माणसाच्या जीवनाशी निगडित असलेली एक चर्चा आहे ती अशी की...

काय करू शकते एक ग्रॅम मीठ?

तू मला मिठासारखी आवडते असे सांगून मिठाची महानता जगाला पटवून देणारी पुराणातली कथा सोडून दिली तरी आजही एखाद्या पदार्थात मीठच नसेल तर तो पदार्थ कितीही श्रम करून बनवला गेला असला तरी त्याला चविष्ट म्हणता येत नाही. आहारातील मीठ तर...
Skip to content