Homeपब्लिक फिगरशिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून...

शिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून अधिकाराचा गैरवापर?

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस दिवसेंदिवस वाढत असून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मंत्री सुभाष देसाई यांच्यावरच निशाणा साधला आहे. देसाई यांच्या अखत्यारीतील खनिकर्म महामंडळाच्या कारभारात पदाचा गैरवापर झाल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

याबाबत पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एक पत्र पाठवून ही बाब निदर्शनाला आणली आहे. मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीतली राष्ट्रवादी काँग्रेस याकडे किती लक्ष देते आणि काँग्रेस हा मुद्दा किती ताणते यावर ही धुसफूस किती प्रमाणात ताणली जाईल हे स्पष्ट होईल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना २१ मे २०२१ रोजीच पत्र पाठवले होते. परंतु या दोघांपैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नानांनी २३ जून २०२१ पुन्हा एक पत्र पाठवून याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांच्याकडून हे पत्र प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे कळते. नागपूरच्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातर्फे रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, पदाचा अनधिकृत वापर करून टेंडरचे नियम डावलून कोळसा पुरवठा व वॉशिंगचे काम महाजनकोसाठी पात्र ठरवून, देकारपत्र दिल्याचा आरोप पटोले यांनी या पत्रात केला आहे.

रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर, ही कंपनी संजय हरदवाणी चालवत असून या कंपनीचे कुठलेही नेटवर्क नाही. टर्नओव्हर नाही. सेक्युरिटी क्लिअरन्स नाही. कोळसा वॉशिंग करण्याचा काहीही अनुभव नाही. त्यांनी ज्या कंपनीबरोबर संयुक्त भागिदारी केली आहे, ती कंपनी काळ्या यादीत टाकण्यात आली आहे. रूखमाई कंपनीने निविदेच्या कोणत्याही अटी व शर्तींची पूर्तता केलेली नाही. तरी या कंपनीला पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

ही कंपनी महाजनकोला वेळेवर कोळसा पुरवू शकत नाही. त्याचा परिणाम महाजनकोच्या वीज उत्पादनावर होईल. त्यामुळे या निविदा प्रक्रियेला ताबडतोब स्थगिती द्यावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content