Homeटॉप स्टोरीस्थलांतरीतांच्या भरवशावर लॉकडाऊनचे...

स्थलांतरीतांच्या भरवशावर लॉकडाऊनचे भवितव्य?

राज्यातल्या वाढत्या कोरोनाला थोपविण्यासाठी लॉकडाऊन लावणे अपरिहार्य असले तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता जास्तीतजास्त स्थलांतरीत वर्ग आपापल्या मुक्कामाला पोहोचेपर्यंत लॉकडाऊन टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा राज्याच्या विविध शहरांमध्ये राज्यातील, परराज्यांतील कामगार, मजूर मोठ्या प्रमाणात राहतो. मागच्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हा वर्ग जे हाती लागेल ते घेऊन आपापल्या गावी निघाला होता. त्यावेळी रेल्वेसुद्धा बंद होती आणि रस्त्यावरून एसटीही धावत नव्हत्या. रोजगार बुडाल्याने त्यांना आपले घर गाठण्याशिवाय पर्यायही नव्हता. मात्र, जसजसा लॉकडाऊन सैल झाला तसतसा हा वर्ग पुन्हा आपल्या रोजगारासाठी शहरांमध्ये विसावला. आता कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी आणि विविध निर्बंध लावण्यात आले असले तरी रेल्वे आणि बस ही प्रवासाची अत्यंत महत्त्वाची साधने सुरू आहेत.

मागच्या खेपेला तासनतास पायपीट करणाऱ्या या मजुरांना केंद्र सरकारने विविध मार्गाने मदत केली होती. राज्य सरकारकडे याकरीता अन्नधान्य दिले होते. राज्याला विविध पॅकेजद्वारे मदतही मिळाली होती. त्याखेरीज विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, यावेळी अशी कोणतीही मदत दृष्टीक्षेपात दिसत नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर या लोकांसाठी करावा लागणारा खर्च शासनालाच सोसावा लागणार आहे. ही शक्यता ध्यानात घेऊन गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊन लावण्याचे वातावरण तयार केले जात आहे. यामुळे जास्तीतजास्त मजूर, कामगार आपापल्या कुटुंबासह आपापल्या मुक्कामी पोहोचेल आणि नंतर त्यांना पोहोचविण्याची जबाबदारी सरकारला उचलावी लागणार नाही, असा हा सारा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासाठी बनविलेल्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सशीही दोनवेळा दीर्घ चर्चा केली. या चर्चेत त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किमान १५ ते २१ दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा अशी शिफारस केली आहे. कोरोनामुळे वर्षभर भरडलेल्या लोकांनी लॉकडाऊनला केलेला विरोध आणि भारतीय जनता पार्टीने या वर्गाला दिलेला पाठिंबा लक्षात घेता आणि राज्याची डबघाईला गेलेली अर्थव्यवस्था पाहता या लोकांसाठी कोणते पॅकेज जाहीर करता येईल, याची आखणी राज्य सरकार करत असल्याचे कळते.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content