Homeमाय व्हॉईस११ वर्षांपूर्वीच वर्तवले...

११ वर्षांपूर्वीच वर्तवले गेले कोविडचे भाकीत?

तुम्हाला जर असे वाटत असेल की ही कोविड-१९ (कोरोना) या वैश्विक महामारीला जर २०१९च्या अखेरीला सुरूवात झाली आणि तीसुद्धा चीनमधून, तर तुम्ही अंशतः बरोबर आहात.

खरेतर, ऑपेरशन लॉकस्टेपमध्ये रॉकफेलर फाऊंडेशनने हया वैश्विक महामारीचे भाकित आणित्याचे दुष्परिणाम याची नोंद मे  २०१०मध्येच करून ठेवली होती आणि तसेच आज घडत आहे! कोविड-१९ महामारी त्याचा फक्त एक सब-प्लॉट आहे. रॉकफेलर फाऊंडेशनने या कोविड-१९च्या उपकटाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ५४ पानी अहवालात मे २०१०मध्येच नमूद करून ठेवला होता. त्यानंतर काही महिन्यानंतर २०११मध्ये हॉलीवुडच्या “कंटेजीयन” या चित्रपटात या सगळ्या कटाचा उलगडादेखील होतो. हा केवळ एक योगायोग असू शकत नाही.

ऑपेरशन लॉकस्टेपमध्ये एका त्रिस्तरीय हल्ल्याची गोष्ट बोलली गेली आहे, यामध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती सारस, एचआयव्ही आणि मरस या तीन व्हायरसच्या घातक गुणांचे  मिश्रण आहे. आपरेशन लॉकस्टेप म्हणजे कोरोना व्हायरसचा तीन टप्प्यात लोकांमध्ये फैलाव करणे, त्याची दहशत निर्माण करणे, इतर कुठल्याही औषध प्रणालीपेक्षा वॅक्सिन हाच एकमेव पर्याय आहे याची लोकांमधून कबुली घेणे आणि ती कबुली जर मिळाली नाही तर तिसऱ्या टप्प्यात याच्यापेक्षा आणखी घातक अशा कोरोना व्हायरसचा फैलाव करणे हा त्यामागचा उद्देश्य आहे.

आपण सध्या या कटाच्या फेज टू किंवा दुसऱ्या लाटेत आहोत. येणाऱ्या फेज तीन किंवा तिसऱ्या लाटेचे उद्देश्य म्हणजे जे लोक लस घेत नाहीत, किंवा सांगण्याला अजिबात जुमानत नाहीत त्यांना मारूनमुटकून लस घेण्यास भाग पाडणे हे अभिप्रेत आहे. त्यासाठी एक अत्यंत घातक असे जैविक हत्त्यार तयार करायचे म्हणजेच कोरोना व्हायरस तयार करणे हा आहे. त्याचा उद्देश्य एवढाच आहे की, यातून आणखी जीवित हानी घडवून आणायची आणि जे  सर्वात जास्त तंदुरुस्त असतील तेच फक्त पुढे जीवंत राहतील.

द लॉकस्टेप म्हणजे एक सबप्लॉट आहे ज्यामध्ये क्लेवर टूगेदर, हॅक अटॅक आणि स्मार्ट स्क्रॅम्बल आहे. यांची निर्मिती वैश्विक अर्थव्यवस्था नेस्तनाबूत करण्यासाठी आहे! द क्लेवर टूगेदर हा एक सबप्लॉट आहे ज्यात एक असे विश्व निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यात एक अतिविकसित, नियंत्रित आणि यशस्वी रणनीतीची निर्मिती केली जाईल जी तातडीच्या व व्यापक वैश्विक विषयांवर तोडगा काढू शकतील.

द हॅक अटॅक या सबप्लॉटमध्ये अर्थव्यवस्था अस्थिर असेल आणि तिच्यात आणखी हादरे सहन करण्याची ताकद नसेल, गुन्हेगारी प्रवृत्ती बळावेल आणि ते खतरनाक मार्ग मार्ग शोधतील.

सरते शेवटी, स्मार्ट स्क्रॅम्बल या सबप्लॉटमध्ये आर्थिकदृष्टया डिप्रेशनमध्ये गेलेल्या जगात, व्यक्ती आणि समाज स्थानिक, तात्पुरत्या, जुगारी स्वरूपाच्या पर्यायांचा शोध घेतील व समोरच्या समस्यांवर तात्पुरते मार्ग काढतील.

ऑपेरशन लॉकस्टेपच्या पहिल्या टप्प्यात साधी सर्दी, फ्लूसारखे सौम्य स्वरूपाची लक्षणे असतील, त्यात प्रसारमाध्यमांकडून व्यापक भीतीचे वातावरण निर्माण केली जाईल, चुकीच्या चाचणी पद्धती वापरल्या जातील, ज्यामुळे कुठलाही जनुकीय पदार्थ घेऊन ती पॉजिटिव रिजल्ट देईल, कोविड केसेसचे आकडे मृत्यू प्रमाणपत्रात फेरफार करून वाढवून सांगितले  जातील. दुबार मोजणी, इतर रोगांपासून किंवा नैसर्गिक कारणामुळ्ये झालेले मृत्यूसुद्धा  कोविड-१९चे मृत्यू म्हणून दाखवले जातील. लॉकडाऊनमध्ये लोकांना जाचक कायदयांच्या दहशतीखाली जगायला भाग पाडले जाईल. निदर्शने करणारे आणि विरोध करणारे सहज हेरता येतील. अन्नाचा तुटवडा, सोशल डिस्टनसिंग, मास्क घालणे, अपूर्ण सूर्यप्रकाश आणि हेल्थी  बॅक्टेरियांच्या अभावामुळे पहिल्या टप्प्यात संक्रमित व कमकुवत परिस्थिती निर्माण होईल.

कोविड

5Gच्या रेडिएशनला एक्स्पोज झाल्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होईल.  त्यामुळे असे लोक समाजात जेव्हा पुन्हा वावरायला लागतील तेव्हा अधिक लोक आजारी पडतील. ह्याचे सगळे खापर कोविड-१९वर फोडले जाईल. हे सगळे लसीकरण होण्यापूर्वी होईल, जेणेकरून लसीकरण हाच एकमेव उपाय आहे हे भासवण्यात येईल. जोपर्यंत सर्व लोक लस घेत नाहीत तोपर्यंत एक प्रदीर्घ  लॉकडाऊन पुन्हा लादण्यात येईल.

बहुसंख्य लोक जर लस घेण्यास नकार देणार असतील तर अशा परिस्थितीत कोविड-१९च्या लॉकस्टेपच्या तिसऱ्या टप्प्यात, जैविक हत्त्यार म्हणून सारस, एचआयव्ही आणि मरस या  तीन व्हायरसचे घातक गुण घेऊन तयार केलेला कोरोना व्हायरस सोडला जाईल. (त्याची निर्मिती २०१५मध्येच केली गेली होती.) बरेच लोक यात मरतील. जो सर्वात सुदृढ असेल  तोच पुढे जगेल. ज्या लोकांनी लस घेतली आहे ते व ज्यांनी लस घेतली नाही ते असा संघर्ष सुरू होईल. त्यामुळे सगळीकडे अराजकता माजेल.

या अहवालानुसार, पुढचे पाऊल म्हणजे या व्हायरसचा रिसर्च स्ट्रेन दुसऱ्या क्लास फोर लॅबमध्ये म्हणजे नॅशनल माइक्रोबायोलॉजी लॅब, विनिपेग, कॅनडा येथे घेऊन जाणे आणि तेथून जाणीवपूर्वक त्याची चोरी व तस्करी करून चीनमध्ये नेणे, यासाठी चिनी नगरिक शी जांग ली ह्याला जाणीवपूर्वक हेरण्यात आले होते. त्याने हा व्हायरस चीनच्या एकमेव क्लास फॉर लॅब वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, वुहान येथे घेऊन जाणे अपेक्षित होते.

वेळप्रसंगी हे सगळे नाकरण्याची जर वेळ आलीच तर, एक तयार सर्वश्रुत जाहीर स्क्रिप्ट  असणे आवश्यक आहे. प्राथमिक स्क्रिप्ट म्हणजे हे सगळे नैसर्गिक होते आणि बॅकअप स्क्रिप्टम्हणजे चीनने हे सगळे निर्माण केले आणि आपघाताने सोडून दिले. हे पुरेसे नव्हते की काय, अहवालात पुढे म्हटले आहे की, सगळ्या बोलक्या डोक्यांना निधी दया, फौची (डॉ. एंथोनी फौची), बिर्क्स (डॉ. डेबोराह बिर्क्स), टेडरोस (डॉ. अधानोम घेब्रेएसस टेडरोस) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO), नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एलर्जी एंड इन्फेक्शस डिजिसेस (NIAID), द सेंटर्स फॉर डीजीस कंट्रोल एंड प्रिवेंशन (CDC – USA) आणि संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) अशा जागतिक संघटना ह्या वैश्विक महामारीमध्ये प्रतिक्रिया देण्यास प्राधिकृत असतील, जेणेकरून पूर्वनियोजित स्क्रिप्टप्रमाणे हे सगळे ऑपरेशन घडवून आणता येईल.

डॉ. डेबोराह बिर्क्स, या एक अमेरिकन डॉक्टर व राजदूत आहेत, ज्यांनी २०२०-२१मध्ये ट्रम्प प्रशासनात व्हाइट हाऊस कोरोना व्हायरस रिस्पॉन्स को-ऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले होते. डॉ. एंथोनी फौची हे एक अमेरिकन डॉक्टर व संशोधक, इम्युनोलॉजिस्ट आणि NIAIDचे  डायरेक्टर आहेत. डॉ. अधानोम टेडरोस हे जागतिक आरोग्य संघटना (WHO)चे डायरेक्टर जनरल आहेत.

पब्लिक क्वारंटाईन, निर्बंध, प्रतिबंध व आइसोलेशनचे आदेश शक्यतोवर प्रदीर्घ काळासाठी  अंमलात ठेवा. त्यामुळे एखाद्या प्रदेशची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, जनप्रक्षोभ उफाळून येईल, पुरवठा साखळी मोडून जाईल आणि मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. लोकांची प्रतिकारशक्ती कमी होईल. इतर संभावित पर्यायी चिकित्सा व औषधी शास्त्र प्रणालीला कमी लेखावे, त्यावर जोरदार हल्ला चढवावा, असेही या अहवालात म्हटले आहे.

हा अहवाल व त्यावर आधारित विविध कथानके सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. ही कल्पना असली तरी आज ती वास्तवात दिसत आहे हे नक्की!

Continue reading

Skip to content