Homeमुंबई स्पेशलमराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाला...

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांना बोलवा!

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यासह सबंध देशाला माहित व्हावा व या इतिहासाची जाणीव पुढच्या पिढीला असावी यादृष्टीने यंदाचा अमृत महोत्सवी मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करावे, अशी विनंती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडला. त्याचे समर्थन करताना मुंडे बोलत होते. मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मंत्रिमंडळाची एक बैठक छत्रपती संभाजी नगरला घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

निजामाच्या राजवटीत झालेले अत्याचार व त्याविरुद्ध मराठवाड्याने दिलेला निकराचा लढा यामध्ये मराठवाड्यातील संत परंपरा, लढाऊ वृत्ती, ज्ञान, संस्कृती यांनी झालेली पायाभरणी, त्याचबरोबर मराठवाड्याला सुरुवातीपासून असलेला संघर्षाचा वारसा याचीही आठवण त्यांनी करून दिली. स्वातंत्र्यलढ्यात नेतृत्त्व केलेले स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, भाऊसाहेब वैशंपायन, राविणारायन रेड्डी, बाबासाहेब परांजपे आदी हुतात्म्यांचे स्मरणही त्यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असून या संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हरघर तिरंगा अभियान राबवून घरोघरी तिरंगा ध्वज उभारला, त्याच धर्तीवर यंदा १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करताना घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्यात यावा. अशा पद्धतीचा अध्यादेश काढण्यात यावा अशी विनंतीही धनंजय मुंडे यांनी केली.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content