Sunday, December 22, 2024
Homeबॅक पेज'इन्शुरन्सदेखो'ने पटकावले ग्रेट...

‘इन्शुरन्सदेखो’ने पटकावले ग्रेट प्लेस टू वर्कचे प्रमाणपत्र

इन्शुरन्सदेखो, या भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक ब्रँडला या वर्षाचे ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र ख्यातनाम ग्रेट प्लेस टू वर्क® असेसमेंट अँड रिकगनिशन प्रोग्रामअंतर्गत दिले जाते आणि त्यातून इन्शुरन्सदेखोच्या विश्वास, कर्मचारीवाढ, विकास आणि नावीन्यपूर्णता यांना चालना देण्याच्या वचनबद्धतेप्रती महत्त्वाचे आहे.

या वर्षी प्रथमच इन्शुरन्सदेखोने या सर्वेक्षणात सहभाग घेतला आणि या उपक्रमातून ब्रँडच्या वाढ व सर्वोत्तमता यांच्यासाठी सर्वसमावेशक वर्कप्लेस पर्यावरणाच्या निर्मितीप्रती वचनाला अधोरेखित करण्यात आले. यातील सखोल मूल्यमापन प्रक्रियेत विविध निकष जसे कार्यस्थळाची संस्कृती, समावेशकता, निष्पक्ष कार्यपद्धती, वाढीच्या क्षमता आणि इतर अनेक गोष्टींचा विचार केला गेला. 

इन्शुरन्सदेखोच्या संस्कृतीला कार्यस्थळाचा अभिमान, विश्वासार्हता आणि आदर तसेच न्याय्यपूर्णता यांच्याप्रती वचनबद्धता या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुण मिळाले आहेत. आपल्या कर्मचारी प्रथम धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीने सातत्याने वैविध्यपूर्ण वाढ, सहभागात्मक निर्णय प्रक्रिया आणि सबलीकरण या गोष्टींवर भर देऊन विश्वास व न्याय्यता या पायांवर ती उभी आहे.

इन्शुरन्सदेखोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक अंकित अग्रवाल म्हणाले की, इन्शुरन्सदेखोचे या सर्वेक्षणातील सहभागाचे पहिलेच वर्ष असताना हे ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र मिळणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र आमच्या एका आगळ्यावेगळ्या कार्यस्थळाच्या उभारणीप्रति वचनबद्धतेचे प्रतीक आहे. इथे कर्मचारी प्रचंड मेहनत करून आमच्या एकत्रित यशात योगदान देतात. मूल्ये, न्याय्यता आणि आमच्या टीमचे सबलीकरण यांच्यावरील सातत्यपूर्ण लक्ष्याचे हे प्रतीक आहे.

इन्शुरन्सदेखोच्या सीएचआरओ दिव्या मोहन म्हणाल्या की, इन्शुरन्सदेखोमध्ये आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना व्यवसायाच्या केंद्रस्थानी ठेवतो आणि जीपीडब्ल्यूआयने प्रमाणित होणे ही गोष्ट आम्ही दररोज करत असलेल्या गोष्टींमधील आमच्या निष्ठा दर्शवते. आम्हाला प्रत्येक व्यक्तीचे मूल्य जपणाऱ्या, वाढीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि सर्वांसाठी न्याय्य व काळजीवाहक वातावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वसमावेशक संस्कृतीचा अभिमान आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content