Thursday, November 7, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजमहागाई शिगेला! 'आनंदाचा...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. ‘दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे शीर्षक त्याला होते. हे सर्व नॉर्मलच होतं. पण आता या घडीला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे अनायासे हाती लागत आहेत. सर्वसामान्यांचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी वा काही ठिकाणी तर न्यूनतम श्रेणीत मोडत असताना आपल्या भावी लोकप्रतिनिधीचे सध्याचे उत्पन्न मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत दहा-बारा पटीने वाढलेले त्यांनीच कबूल केलेले आहे.

नाहीतर सगळेच नेते सांगत असतात ‘झोली लेके आया हु..’ हिंदूने केलेल्या पाहणीत केवळ दोन वेळचे जेवण कसे व किती महागले आहे याचा तक्ताच दिलेला आहे. डाळभात जेवायचे म्हटले तरी डाळीचा भाव सामान्य माणसाच्या आवाक्यात नाही. वास्तविक डाळीचे महत्त्व सर्व जेवणात असते. या डाळी अनेक ठिकाणी १५० रु किलोच्या पुढे गेलेल्या आहेत. तेलाचे भाव तर कढीतल्या गरम तेलाप्रमाणे कडकडत आहेत. कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो या इतर वस्तूंच्या भावाचे तर विचारूच नका! उलट लोकप्रतिधीच्या उत्पनात मात्र ‘कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे परदेशाकडे..’ अशी अवस्था आहे.

निवडणूक आयोगाची ही कमाल आहे. राज्यातील गरिबांसाठीचा ‘आनंदाचा शिधा’ ही काही नवीन योजना नाही. तरीही कोट्यवधी गरीब जनतेला या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ मिळणारच नाही. कुठल्या बोरुबहाद्दराने हा ‘आनंद’ रोखला याची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तातडीने शोधून काढावे व त्याला हाकलून द्यावे, अशी जनतेची भावना आहे .यावर विंदा कारंदीकर आठवतात-

“जळताना जळो। निदान ही भूक

प्रार्थना ही एक। करा आता

नागड्यानो उठा। उगवा रे सूड

देहाचीच चूड। पेटवोनी”

छायाचित्र मांडणी- प्रवीण वराडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content