Homeब्लॅक अँड व्हाईटपर्थ कसोटीत भारताचा...

पर्थ कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!

ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी हा दौरा खडतरच असणार आहे. १९९१-९२नंतर पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नुकत्याच मायदेशी झालेल्या न्युझिलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला ३-० असे “व्हाइट वॉश”ला प्रथमच सामोरे जावे लागले. ही मालिका संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला. न्युझिलंडविरुद्धच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियात भारताचे काही खरे नाही अशीच चर्चा भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये सुरु झाली होती. त्यातच भारताचा पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियातील सर्वात वेगवान खेळपट्टीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्थ स्टेडियममध्ये सुरू झाला. त्यामुळे सुरुवातीपासूनच या दौऱ्याचा पेपर भारतासाठी सोपा नव्हता. पण भारताने पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेचा निकाल काय लागणार याचेही संकेत दिले आहेत.

गेल्या २ कसोटी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचा आगळा पराक्रम भारताने केला होता. आता यंदा सलग तिसरा विजय मिळवून भारतीय संघ विजयाची हॅटट्रिक साधणार का? याचीदेखील उत्सुकता भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये होती. न्युझिलंडसमोरील पराभवामुळे भारतीय संघातील खेळाडूवर प्रचंड दडपण आले होते. त्यातच भारताचे प्रमुख स्टार खेळाडू कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा, आर. अश्विन यांची सध्याची कामगिरी चांगलीच खालावली आहे. त्यामुळे भारतासाठी हीदेखील चिंतेची मोठी बाब होती. या सर्वातून भारतीय संघ कितपत बाहेर पडतो त्यावरच भारताचे मालिका यश अवलंबून राहणार आहे.

ऑस्ट्रेलियन दौरा हा प्रतिस्पर्धी संघांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला. यजमान ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे तेवढे सोपे नाही हे नक्की. आतापर्यंत झालेल्या ऑस्ट्रेलियातील एकूण ४४५ कसोटी सामन्यात त्यांनी २५९ विजय मिळवले. अवघे १०२ सामने त्यांनी गमावले तर ८३ सामने अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळाले. ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्ट्यांवर त्यांच्या तेज गोलंदाजांचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असेल. भारतीय फलंदाजांनी त्यांचा योग्य मुकाबला केला तर भारताला विजयाची आशा बाळगता येईल. प्रत्येक कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, आज विश्वातील अव्वल तेज गोलंदाज कर्णधार कमिन्स, हेजलवुड, स्टार्क त्यांच्या ताफ्यात आहेत. तसेच त्यांचा सर्वोत्तम अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लिऑन हादेखील भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

१९४७पासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहे. आतापर्यंत झालेल्या दौडमधील गेल्या २ मालिकांचा अपवाद वगळता एरवी भारताला ऑस्ट्रेलियात कधीच मालिका जिंकता आली नाही. उभय संघात एकूण ११ मालिका झाल्या आहेत तर यजमानांनी मालिकांत विजय मिळवला आहे. भारताला अवध्या २ मालिका जिंकता आल्या, तर केवळ एक मालिका बरोबरीत सोडवता आली. एकूण ४४ कसोटी सामन्यांमध्ये भारताने अवघे ५ विजय मिळवले. २८ सामन्यांत भारत पराभूत झाला तर ११ सामने अनिर्णित राहिले. दोन्ही संघातील अनुभवी खेळाडूंवरच या मालिकेची जय-पराजयाची मालिका अवलंबून राहणार आहे. पहिल्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही. अनुभवी वेगवान महमद शमीची उणीव भारताला या मालिकेत चांगलीच जाणवणार आहे. त्याच्या गैरहजेरीत बुमराहवर गोलंदाजीचा मोठाच भार पडणार आहे. न्युझिलंड मालिकेतील पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अनुभवी खेळाडूंबाबत बचावाची भूमिका घेत आहेत हेदेखील योग्य नाही. ऑस्ट्रेलियन संघ माइंड गेम खेळण्यात वाकबगार आहे. तसेच ते नेहमीच आक्रमकतेला प्राधान्य देतात. भारतानेदेखील त्याच शैलीत ऑस्ट्रेलियाला उत्तर द्यायला हवे. माजी कर्णधार विराटची बॅट ऑस्ट्रेलियात नेहमीच चालली आहे. त्याला पुन्हा तसाच सूर गवसतो का है बघणे महत्त्वाचे ठरेल. त्याला पुन्हा सूर गवसला तर ते भारतासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकते.

जबरदस्त अपघातातून बचावलेल्या यष्टिरक्षक पंतने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. या दौऱ्यातदेखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय संघ बाळगून असेल. पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने नाथन आणि जोश या दोन नविन चेहन्यांना संधी दिली आहे. नाथन कदाचित ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. तर जोशचा त्यांच्या राखीव फलंदाजांमध्ये समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियन खेळपट्टीचा या फलंदाजांसाठी काहीशा अनुकूल असतात. त्यामुळे आपल्या अनुभवी फलंदाजांचा तेथे जम बसायला हरकत नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्स आणि त्यांचा माजी कर्णधार स्मिथ या दोघांवर त्यांची मोठी मदार असणार आहे. या दोघांना मालिकेत चांगला सूर गवसला तर भारताचे काही खरे नाही.

ऑस्ट्रेलियन संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी निश्चितच उंचावली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे चांगले नेतृत्त्व करुन खेळाडूंमध्ये एक नवा जोश निर्माण केला. २०२१नंतर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत झालेल्या कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियामधील १७ कसोटीत १२ विजयाची नोंद केली आहे. मानाची इंग्लडविरुद्धची अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियाने आपल्या इथे जिंकली, तर त्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती २०२३मध्ये पुन्हा करून दाखवली. ५ कसोटी सामन्यांची मालिका असल्यामुळे खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती या दोघांचा कस लागणार आहे. यजमान या नात्याने ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असले तरी भारताने न्युझिलंडविरुद्ध झालेल्या मालिकेला निरोप देऊन आता पूर्णपणे ऑस्ट्रेलियातील मालिकेवर लक्ष केंद्रीत करुन पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. न्युझिलंडविरुद्ध झालेल्या चुका टाळायला हव्यात.

फलंदाजांनी खास करून योग्य फटक्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच दीर्घ काळ खेळपट्टीवर घट्ट पाय रोवून उभं राहायचा प्रयत्न करायला हवा. न्युझिलंडविरुद्धच्या मालिकेत खराब फटक्यांमुळे बरेच भारतीय फलंदाज बाद झाले. तसेच दीर्घ काळ फलंदाजी करण्याचा आणि संघाची एक बाजू लावून धरण्याचा फारसा प्रयत्न कुणी केला नाही. त्याचीच किंमत भारताला न्युझिलंडविरुद्ध चुकवावी लागली. कर्णधार रोहित, विराट, जडेजा, अश्विन यांचा बहुदा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल. तेव्हा आपल्या शेवटच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात चांगली कामगिरी करून हा दौरा ते स्मरणीय करतील अशी आशा त्याचे चाहते करत असतील. तसेच या दौऱ्यातील कामगिरीवर या दिग्गज खेळाडूंचे पुढील भवितव्यदेखील अवलंबून राहणार आहे. त्यामुळे हा दौरा त्यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. जागतिक कसोटी सामन्याची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला या मालिकेत ४-० असा मोठा विजय मिळवावा लागणार आहे. त्याच्या जवळपास भारतीय संघ पोहोचतो का हे बघणे महत्त्वाचे ठरेल. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर तेज गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे हा इतिहास आहे. येथे आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यात ७३ टक्के वेगवान गोलंदाजांनीच बळी घेतले आहेत. भारताकडेदेखील चांगले वेगवान गोलंदाज असल्यामुळे पर्थ कसोटी जिंकून या दौऱ्याचा भारतीय संघ शुभारंभ करणार का? याकडे तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. तो ऐतिहासिक विजय भारताने मिळवला आहे. विश्वातील हे दोन्ही बलाढ्य संघ असल्यामुळे उभय संघातील चेंडू-फळीतील युद्ध रंगतदार होईल हे निश्चित.

Continue reading

जाणून घ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन टेनिस स्पर्धेविषयी…

जून महिना उजाडला की साऱ्या टेनिसविश्वाला वेध लागतात ते लंडनमध्ये होणाऱ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे. टेनिस जगतात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या चार ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा मानाच्या, प्रतिष्ठेच्या म्हणून समजल्या जातात. पण या चार स्पर्धांत विम्बल्डन स्पर्धेची...

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला मिळाली नवसंजीवनी!

क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डस मैदानात झालेल्या आयसीसी कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून आरामात पराभव करून जेतेपदावर कब्जा केला. या विजयाबरोबरच द .आफ्रिकेने आयसीसी स्पर्धा विजयाचा २७ वर्षांचा दुष्काळ संपवला. तब्बल ९७२२ दिवसांनी आयसीसी स्पर्धा...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रेयसला डावलल्याचीच चर्चा!

आजपासून यजमान इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या ५ सामन्यांच्या तेंडुलकर-अंडरसन चषकासाठीच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या पाहुण्या भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गज भारतीय खेळाडूंच्या गैरहजेरीत भारत पहिल्यांदा कसोटी...
Skip to content