Homeन्यूज ॲट अ ग्लांसपोप फ्रान्सिस यांच्या...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहण्यासाठी तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. 22 आणि 23 एप्रिलला दोन दिवसांचा शोक पाळण्यात आला तसेच अंत्यसंस्काराच्या दिवशी म्हणजे उद्या एका दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळला जाईल. पोप फ्रांसिस हे एकविसाव्या शतकातील पोप आहेत. ते २६६वे पोप आहेत. ते अमेरिका खंडातून निवड झालेले सर्वप्रथम आणि पोप ग्रेगरी तिसऱ्यानंतर पोपपदी येणारे युरोपाबाहेरचे पहिले पुरुष आहेत. पोप फ्रान्सिस यांचे मूळ नाव होर्हे मारियो बेर्गोलियो होते. 17 डिसेंबर 1936 रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 88व्या वर्षी 21 एप्रिल 2025 रोजी त्यांचे निधन झाले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content