Homeबॅक पेजभारताने 2014पासून आतापर्यंत...

भारताने 2014पासून आतापर्यंत केले 396 परदेशी उपग्रह प्रक्षेपित!

भारताने 2014-23 या कालावधीत 396 परदेशी आणि 70 देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपित केले, तर 2003-13 या कालावधीत भारताने 33 परदेशी आणि देशांतर्गत 31 उपग्रह प्रक्षेपित केले होते अशी माहिती  केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल दिली.

लोकसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, 2014-23 या दशकात उपग्रह प्रक्षेपणातून मिळणारा महसूल 157 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 260 दशलक्ष युरो इतका आहे. 2003-13 या दशकात संबंधित आकडा 15 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 32 दशलक्ष युरो होता.

अंतराळ विभागाला दिलेली वार्षिक आर्थिक तरतूद आर्थिक वर्ष 2013-14 मधील 6,792 कोटी रुपयांवरून 2023-24साठी 12,544 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. विविध जागतिक अंदाज आणि बातम्यांनुसार, येत्या काही वर्षांत या क्षेत्राची वाढ 6-8% दराने होईल, असे त्यांनी सांगितले.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content