Homeमुंबई स्पेशलकोलकाता बलात्कारप्रकरणी इंडी...

कोलकाता बलात्कारप्रकरणी इंडी आघाडीचे मौन

कोलकाता येथे एखाद्या सैतानालाही लाजवेल अशी बलात्काराची घटना घडूनही या बलात्काऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, असदुद्दीन ओवैसी ही इंडी आघाडीची मंडळी एक शब्दही काढत नाहीत. अशा बलात्काऱ्यांच्या, लव्ह जिहाद्यांच्या विरोधात लढण्याचा भारतीय जनता पार्टीचा निर्धार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले.

विशिष्ट सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित, विशिष्ट धर्माशी संबंधित बलात्कारींना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खुलेआम पाठीशी घालत आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन देण्याबाबत इंडी आघाडीने मौन बाळगले आहे, असे ते म्हणाले.

बलात्काऱ्यांना संरक्षण देऊन पश्चिम बंगालला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींंनी बलात्कारी राज्य केले आहे. वर्षोनवर्षे अशा बलात्काराच्या निंदनीय घटना पश्चिम बंगालमध्ये होत आहेत. मात्र या प्रकरणांत बलात्कारी

गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासंदर्भात इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांचे मौन बरेच काही सांगते. कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर तृणमूल काँग्रेसने या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याविरोधात आवाज उठविणाऱ्या सामान्य नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोपही शुक्ला यांनी केला.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राक्षसी बलात्कार केलेल्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे वक्तव्य करतात, तर दुसरीकडे इंडी आघाडीला पीडित महिलेबाबत जरासुद्धा कणव नाही. विशिष्ट धर्माचे लोक अपराधी असल्यानंतर पीडितांना न्याय देण्याऐवजी ही मंडळी बलात्कारी, गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. इंडी आघाडी ही बलात्कारी बचाव आघाडी असून त्यांच्या मुस्लीम अपराध्यांना पाठीशी घालण्याच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये रोष निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मविआ म्हणजे मजहबी, व्यभिचारी आणि अपराधी आघाडी असून या आघाडीचे उद्धव ठाकरे व अन्य नेते लव जिहाद करणाऱ्यांचे संरक्षक आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे दोघेही पीडित महिलांच्या बाजूने उभे न राहता मुस्लीम अपराधींना वाचवण्याचा हीन प्रयत्न करत आहेत, असेही शुक्ला म्हणाले.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content