Homeमुंबई स्पेशलमालाड परिसरात उद्या...

मालाड परिसरात उद्या मियावाकी जंगल उद्यानाचे लोकार्पण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ-४मध्ये, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरात प्रभाग ३४मध्ये चारकोप नाका (अथर्व महाविद्यालयजवळ) येथील भूखंडावर नागरी वन उपक्रम अंतर्गत (मियावाकी जंगल) वृक्षारोपण व इतर संकीर्ण कामांचा लोकार्पण सोहळा उद्या, रविवारी (दिनांक ३ डिसेंबर २०२३) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यास मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, योगेश सागर, अमृता फडणवीस, खासदार हेमा मालिनी, अभिनेत्री जुही चावला, उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

बृहन्मुंबई महानगरपालिका पर्यावरण संतुलनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा सोहळा होत आहे. उद्या नियोजित सोहळ्यात, या उद्यानात २२०० चौरस मीटर जागेवर ८,८०० इतक्या संख्येने आणि विविध प्रकारची देशी जातीची झाडे लावण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने आवळा, हिरडा, बेहडा, शिवण, साग, कडूनिम, जांभूळ, अर्जुन इत्यादी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, पारंपरिक पद्धतीने ६ जातीची १० ते १२ फूट उंचीची १,२०० झाडे संपूर्ण भूखंडाच्या संरक्षक भिंतीलगत लावण्यात येणार आहेत. त्यात करंज, बेहडा, बहावा, कदंब, सुरू, ताम्हण या झाडांचा समावेश असेल. 

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content