Homeबॅक पेजविमान वाहतुकीशी संबंधित...

विमान वाहतुकीशी संबंधित आशियातील सर्वात भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन!

आशियातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा चार दिवसीय आकर्षक कार्यक्रम “विंग्ज इंडिया 24” काल हैदराबादमध्ये सुरू झाला. वाणिज्यिक, सामान्य आणि व्यावसायिक विमान वाहतुकीचा विस्तार दर्शवणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना आहे- “अमृत काळात भारताला जगाशी जोडणे: भारतीय नागरी विमान वाहतूक @2047 साठी ध्येयनिश्चिती”. हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर आयोजित जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राचा प्रारंभ केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी केला.

“वसुधैव कुटुंबकुम” चे तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने नागरी विमान वाहतुकीच्या उद्दिष्टांचे प्रतीक आहे जे सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न साकारताना जगाला एक कुटूंब म्हणून जोडत आहे असे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ज्योतिरादित्य एम सिंधिया म्हणाले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, विमान वाहतूक क्षेत्र हे आर्थिक विकासाच्या प्रमुख चालकांपैकी एक आहे आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये त्याची वाढ अविश्वसनीय आहे. विमान वाहतूक अर्थव्यवस्था महत्त्वपूर्ण आर्थिक आणि सामाजिक फायदे प्रदान करते कारण ती पर्यटन, व्यापार, कनेक्टिव्हिटी सुलभ करते, आर्थिक वाढ निर्माण करते, रोजगार देते आणि दुर्गम समुदायांसाठी जीवनरेखा प्रदान करते आणि अभूतपूर्व परिस्थितीत जलद प्रतिसाद सक्षम करते. भारतीय विमान वाहतूक क्षेत्र 3 एचे प्रतीक आहे: ऍक्सेसिबिलीटी, ऍव्हेलेबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी म्हणजेच सुलभता, उपलब्धता आणि किफायतशीरपणा.

विंग्ज इंडिया 2024 मध्ये आज सात प्रमुख घोषणा करण्यात आल्या.

  • फिक्की आणि केपीएमजीद्वारे नागरी विमान वाहतुकीवरील संयुक्त नॉलेज पेपरचे प्रकाशन
  • उडान 5.3 चे उद्घाटन
  • एअरबस-एअर इंडिया प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ, अधिक विमाने खरेदी करून आणि येत्या काही वर्षांत 10 फ्लाइट सिम्युलेटर आणि 10,000 वैमानिकांना प्रशिक्षित करण्यासाठी गुरुग्राममध्ये उड्डाण प्रशिक्षण केंद्राची स्थापना.
  • अधिक वैमानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटा एएसएल आणि महिंद्रा एरोस्पेस स्ट्रक्चर्स प्रा. लि.सोबत एअरबस उत्पादन करार.
  • जीएमआर आणि इंडिगो ने एरोस्पेस उद्योगात शाश्वत प्रशिक्षण विकसित करण्यासाठी एकाधिक पॅटर्नसह सहयोग करण्यासाठी एक कन्सोर्टियमवर स्वाक्षरी.
  • जीएमआर स्कूल ऑफ एव्हिएशनचे उद्घाटन.
  • 17 महिन्यांच्या कालावधीत 200 विमानांच्या तिप्पट ऑर्डरसह अकासा एअरची कराराची घोषणा.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content