Homeपब्लिक फिगरमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा!

या राज्यात कायद्या आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. आपल्या आया-बहिणींना, माय-भगिनींना नग्न करून नाचवले जात आहे. हा नंगानाच थांबवला जात नसेल तर आम्हाला नाईलाजास्तव राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी लागेल. इतकेच नव्हे तर आज आम्ही तशी मागणीच करत आहोत, असे भारतीय जनता पार्टीचे सदस्य सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

प्रश्नोत्तराच्या तासात श्वेता महाले यांनी जळगावमधल्या आशादीप शासकीयवसतीगृहातल्या एका महिलेला नग्न करून तिला नाचवले गेल्याच्या घटनेविषयीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उपप्रश्नांवर उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची नोंद घेतली जाईल, असे थातुरमाथूर उत्तर दिले. त्यावर संतप्त झालेल्या मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. या राज्यात एका महिलेल्या नग्न करून नाचवले जाते आणि तिची व्हिडिओ क्लिप तयार करून व्हायरल केले जाते आणि सरकार फक्त त्याची नोंद घेते. हे काय चालले आहे. इतकी संवेदनाहीन झाले आहे की काय हे सरकार, असा सवाल त्यांनी केला. या सरकारला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नाही. खरे तर निवडून आलेले सरकार बरखास्त व्हावे, अशी आमचीही इच्छा नाही. मात्र, नाईलाजाने आज आम्हाला ही मागणी करावी लागत आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाची चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. या समितीत जिल्हाधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विरोधक शांत झाले.

याच काळात नवाब मलिक यांनी मुनगंटीवार सरकारला धमकी देत असल्याचे सांगत हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत सरकारने संवेदनशील पद्धतीने काम करावे यासाठीच मुनगंटीवार यांनी असे वक्तव्य केल्याचे सांगितले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी वक्तव्य तपासून घेतले जाईल व त्यातला आक्षेपार्ह भाग काढला जाईल, असे स्पष्ट केले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content