Friday, November 22, 2024
Homeडेली पल्सपुरावे आहेत तर...

पुरावे आहेत तर देशमुखांवर करा कारवाई!

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत का खोटे हे जाणण्याचा राज्यातील जनतेला अधिकार आहे. फडणवीस साडेसात वर्षं गृहमंत्रीपदावर आहेत. त्यांना या खात्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडे काही व्हिडिओ व ऑडिओ क्लिप्स आहेत, असा त्यांचा दावा आहे. फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी व सत्य जनतेसमोर आणून संभ्रम दूर करावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

मुंबईत टिळक भवनमध्ये माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्याविरोधात खोट्या प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी फडणवीस यांनी दबाव आणला होता, हे अनिल देशमुख यांनी जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतरच सांगितले होते. मग कालपर्यंत फडणवीस गप्प का बसले?, देशमुख खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही? फडणवीसाचे सरकार असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात होते. ज्यांनी फोन टॅप केले त्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालकपदी बढती दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धमकी देण्याऐवजी वस्तुस्थिती मांडावी.

देशमुख

समित कदमला पोलीस सुरक्षा आणि जनता मात्र वाऱ्यावर..

सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना गरज नसतानाही पोलीस सुरक्षा दिलेली आहे. समित कदम हा सरकार व व्यापारी यांच्यातील मध्यस्थ व्यक्ती आहे म्हणून त्याला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. ही जनतेच्या पैशाची लूट आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. खून, दरोडे, बलात्कार वाढले आहेत. त्याकडे गृहखात्याचे व सरकारचे लक्ष नाही. पण आपल्या बगलबच्च्यांसाठी पोलीस दल तैनात ठेवले आहे, असे ते म्हणाले.

उरणची घटना अत्यंत गंभीर

नवी मुंबईतील उरणमध्ये एका मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्त्या करण्यात आली. ही घटना अत्यंत गंभीर आहे. राज्यात महिला असुरक्षित आहेत. मुंबई व आसपासच्या भागातच महिला सुरक्षित नाहीत तर राज्यातील इतर भागातील अवस्था काय असेल त्याचा विचार करा. राज्यातून १५ हजारांपेक्षा जास्त मुली-महिला बेपत्ता आहेत. सत्तेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बसले आहेत. गुन्हेगारांना कशाचीही भीती राहिलेली नाही. उरण घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

देशमुख

असंवैधानिक सरकारच्या शेवटच्या घटका

राज्यात दोन वर्षांपूर्वी जे सत्तांतर झाले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नव्हते. हे सत्तांतर करताना देवेंद्र फडणवीस वेश बदलून भेटी घेत होते हे त्यांनीच सांगतिलेले आहे. आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तेच सांगितले. दहा वेळा वेशांतर करुन दिल्लीत भेटी घेतल्या असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तात्पर्य असे की सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष काहीही करु शकतो. हे सरकार असंवैधानिक आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली असून ३ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रकरणाची सुनावणी होऊ शकते. या दोन्ही पक्षातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, असेही पटोले म्हणाले.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content