Homeमुंबई स्पेशलतुम्ही वडिलांना लाज...

तुम्ही वडिलांना लाज वाटली पाहिजे असे म्हणता?

आपण आपल्या पिताश्रींना लाज वाटते का, विचारता? आपण आपल्या वडिलांना लाज वाटते का, विचारता?, असा सवाल वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत आदित्य ठाकरे यांना केला. ही आकडेवारी गेल्या तीन वर्षांतलीच आहे. आदित्य ठाकरेंनी हा असंसदीय शब्द मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आणि सभागृहात एकच गदारोळ झाला.

आदिवासी समाजाच्या बालकांचा कथित कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूच्या विषयावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी असंसदीय शब्दाचा वापर केल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. अखेर कामकाज तपासल्यानंतर तसा शब्द त्यात आला असल्यास काढून टाकला जाईल, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले.

लाज

कुणाल पाटील यांनी काल हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे त्यावरील उत्तर राखून ठेवण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासात आज त्यावर चर्चा झाली. या चर्चेत आदित्य ठाकरे यांनी सदस्यांना लाज वाटली पाहिजे, असा उल्लेख केला. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला आक्षेप घेतला. या बालकांच्या मृत्यूचे आकडे गेल्या तीन वर्षांतले आहेत. तुम्ही तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या तुमच्या वडिलांबद्दल असे कसे बोलू शकता, असा सवाल त्यांनी केला. लाज वाटणे हा शब्द असंसदीय आहे. त्यामुळे अध्यक्षांनी ठाकरे यांना ताकीद द्यावी किंवा ठाकरे यांनी तो शब्द मागे घ्यावा, असे ते म्हणाले.

ठाकरे यांनी शब्द मागे घेण्यास नकार दिला. हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला गेला आहे, हे पाहवे, असा त्यांचा आग्रह होता. यावेळी सत्ताधारी त्यांच्या विरोधात तर विरोधक ठाकरे यांच्या बाजून घोषणा देत होते. जयंत पाटील यांनीही ठाकरे यांनी त्या अर्थाने या शब्दाचा वापर केला नाही, असे सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनी ठाकरे तसेच मुनगंटीवार यांच्या म्हणण्याची नोंद घेतल्याचे जाहीर केले. कामकाज पुस्तिकेतील असंसदीय शब्दांच्या यादीत लाज वाटणे हा शब्द ३५७व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे रेकॉर्ड तपासून तसा शब्द आला असल्यास तो काढून टाकण्यात येईल, असे अध्यक्षांनी जाहीर केले.

दरम्यान, कुपोषणाच्या मुद्द्यावर आदिवासी मंत्र्यांकडून मिळालेल्या उत्तराने आम्ही समाधानी नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content