Monday, December 23, 2024
Homeमाय व्हॉईसखंडणीतला ‘आयपीएस’ वाटेकरी...

खंडणीतला ‘आयपीएस’ वाटेकरी कसा चालतो?

“what do you mean gangster?? Its business” हे वाक्य जेव्हा प्रथम वाचले तेव्हा त्याकडे दुर्लक्षच केले होते. परंतु गेल्या आठवड्यात राज्य पोलीस खात्याशी संबंधित एक खळबळजनक बातमी वाचनात आली आणि वरील वाक्याचा अर्थ झटकन ध्यानी आला. तसा हा अर्थ याआधीच ध्यानी आला होता. आजकाल त्याचा प्रत्ययही अनेक ठिकाणाहून येत असतोच. गेल्या आठवड्यात जी बातमी वाचनात आली होती ती ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्या संदर्भातील आहे. देवेन भारती राज्य पोलीस दलातील एक धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. अशा धडाकेबाज अधिकाऱ्यांचे शत्रूही अनेक असतात. गुंड टोळ्या अशा अधिकाऱ्यांबाबत अनेक प्रकारच्या पुड्या सोडत असतात. पण यावेळी प्रकरण जरा गंभीर दिसत आहे. तसे पाहिले तर बातमीसोबत प्रसारित करण्यात आलेला व्हिडीओ जुना आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांत त्याकडे दुर्लक्ष केले गेले. गुंडाच्या कबुलीजबाबावर किती विश्वास ठेवावा या भावनेतून त्यातील गंभीर आरोपांकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नसावे. याआधी पोलीस सेवेतील एका पोलीस निरीक्षकानेही ह्याच आशयाचे आरोप भारती यांच्यावर केलेले होते. मात्र, भारती कार्यक्षम अधिकारी असल्याने या सर्व आरोपांना केराची टोपली दाखवण्यात आली.

हे सर्व आरोप खोटे असते तर आम्हाला आनंदच झाला असता. परंतु, असे होणे नव्हते. कारण, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी गेल्या वर्षी गृह मंत्र्यांना एक पत्र लिहून भारती यांच्यावर गुंडांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. देवेन भारती यांचे गुंडांशी असलेले संबंध मुंबई पोलीस दलाची कीर्ती धुळीस मिळवतील असा संशयही माजी पोलीस आयुक्तांनी या पत्रात व्यक्त केला होता. आपल्या दिडपानी पत्रात बर्वे यांनी भारती यांच्या कार्यशैलीबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त केली आहे. माजी आयुक्तांचे पत्र आणि व्हायरल झालेला व्हिडीओ यांचा काहीतरी संबंध असावा अशी शंका घ्यायला जागा आहे. कोट्यवधी रूपयांच्या खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एजाज लकडावाला

याने भारती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लकडावाला याच्यावर खंडणीचे विविध आरोप असून वांद्रे येथील एका बिल्डरकडे खंडणीची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यासह त्याच्या मुलीलाही अटक करण्यात आली आहे. लकडावाला यांनी पोलिसांना सांगितले आहे की, खंडणीपोटी मिळालेल्या रकमेचे तीन हिस्से केले जात असत. साहजिकच 50 टक्के मी ठेवत असे तर उरलेल्या 50 टक्क्यांमधील 25 टक्के भारती यांच्याकडे तर बाकी राहिलेले 25 टक्के सलीम महाराज यांच्याकडे पोहोचवले जात असत. हे सलीम महाराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून हवाला व्यवहारातील महागुरू म्हणून गुन्हेगारी जगतात ओळखले जातात. पैसे इथून घेऊन कोणालाही कळण्याच्या आत जगात कोठेही पैसे फिरवण्याचे कसब या माणसाकडे आहे असे बोलले जाते. याचे थेट संबंध महा डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आहेत.

गेल्या दोन सरकारात भारती यांनी ‘ब्लू आय’ बनून कारभार केलेला होता. या दोन्ही सरकारातील काही मंत्र्यांचे खास समारंभ आयोजित करण्यात त्यांचे कौशल्य दिसून आले होते. मागील सरकारातील एका प्रभावशाली नेत्याच्या काही इव्हेंट्स त्यांनी आपले खास कसब वापरून पार पाडल्या होत्या. एकवेळ हा व्हिडीओ खोटा आहे असे मानले तरी माजी पोलीस आयुक्तांच्या पत्राचे काय? गृहमंत्र्यांना पत्र लिहून आता वर्ष लोटले आहे. त्यांनी या पत्रावर काय कारवाई केली किंवा पत्रातील आरोपांची चौकशी करण्यासाठी कोणा ज्येष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा विचार आहे काय? हे तरी मंत्री महोदयांनी जाहीर करणे आवश्यक आहे. राजकारणात तसेच सरकारी नोकरीत कधी कुठली गोष्ट उघड होईल याचा नेम नसतो. तसेच सुशांत सिंह राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही त्याच्या कॉल रेकॉर्डची यादी एका खास वृत्तवाहिनीला पुरवण्याचा संशयही भारती यांच्या पदरात आहे. माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया हे शीना व्होरा मृत्यूप्रकरणी जरुरीपेक्षा जास्त लक्ष घालत असल्याबद्दल ज्येष्ठ नेते व अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्याचे कामही त्यांच्या नावावर आहे “it is a rule of law allow which hinders the rulers from turning themselves in to worst gangsters” असं बोलण्याची वेळ निदान या राज्यात तरी येऊ नये, हीच इच्छा!

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीससाहेब.. एक नजर इधर भी…

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोर केलेले भाषण खरोखरच वाखाणण्यासारखे आहे, यात संशय नाही. मंत्रालयात अभ्यागतांची गर्दी नको तसेच काम कुठल्या स्तरावर आहे याची चौकशी करण्यासाठी नागरिकांचा जत्था मंत्रालयात येतो हे टाळायला हवे असे निक्षून सांगितल्याबद्दल खरंतर...

आता कळले शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कोणाचा?

राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय! महाविकास आघाडीचा सुपडासाफ. राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली असून भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीला दणदणीत यश प्राप्त झालेलं आहे. या दणदणीत विजयाबाबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्रभाऊ फडणवीस व अजितदादा पवार...

प्रचारसभा की बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरावर आधारीत अपशब्दांची मालिका?

येत्या बुधवारी आपल्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊ घातले आहे.अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांवर काय लिहिणार हा खरं तर यक्षप्रश्न आहे. सुमारे दहा-बारा प्रमुख राजकीय पक्ष गेले तीन-चार महिने राज्य घुसळून काढत आहेत. प्रत्येकाचे जाहीरनामे वेगळे, वचननामे वेगळे....
Skip to content