Homeबॅक पेजहोंडा एलीव्‍हेटची नवीन...

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे.

मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी) व कन्टिन्‍युअस्‍ली व्‍हेरिएबल ट्रान्‍समिशन (सीव्‍हीटी) या दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल आणि होंडा एलीव्‍हेटच्‍या व्‍ही व व्‍हीएक्‍स ग्रेडवर आधारित आहे. होंडा एलीव्‍हेटची आकर्षक डिझाइन, एैसपैस जागा व आरामदायी इंटीरिअर्स आणि प्रगत वैशिष्‍ट्यांना अधिक पुढे घेऊन जात अॅपेक्‍स एडिशन एक्‍स्‍टीरिअर व इंटीरिअर सुधारणांच्‍या नवीन प्रीमियम पॅकेजसह येते, तसेच सर्व रंग पर्यायांमध्‍ये सादर करण्यात येईल.

होंडा एलीव्‍हेटच्‍या अॅपेक्‍स एडिशनबाबत मत व्‍यक्‍त करत होंडा कार्स इंडिया लि.च्‍या मार्केटिंग अँड सेल्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष कुणाल बहल म्‍हणाले की, एलीव्‍हेट आमच्‍या यशासाठी साह्यभूत राहिली आहे, तसेच आमच्‍या देशांतर्गत विक्री व निर्यातींप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे. भारतात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे आणि आम्‍हाला होंडा एलीव्‍हेटची आकर्षक किंमत असलेली नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या वेईकलमध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या केबिन अनुभवासाठी सुधारित इंटीरिअर्स, नवीन आकर्षक एक्‍स्‍टीरिअर घटक आहेत, जे वेईकलच्‍या डायनॅमिक व स्‍टायलिश लुकला अधिक आकर्षक करतात. या नवीन एडिशनसह आम्‍ही होंडा कुटुंबामध्‍ये अधिकाधिक ग्राहकांचे स्‍वागत करण्‍यास उत्‍सुक आहोत.

अॅपेक्‍स एडिशनची ठळक वैशिष्‍ट्ये-

एक्‍स्‍टीरिअर सुधारणा:

  • पियानो ब्‍लॅक फ्रण्‍ट अंडर स्‍पॉयलरसह सिल्‍व्‍हर असेंट
  • पियानो ब्‍लॅक साइड अंडर स्‍पॉयलर
  • पियानो ब्‍लॅक रिअर लोअर गार्निशसह क्रोमे इन्‍सर्ट्स
  • फेण्‍डर्सवर अॅपेक्‍स एडिशन बॅज
  • टेलगेटवर अॅपेक्‍स एडिशन एम्‍ब्‍लेम  

इंटीरिअर सुधारणा:

  • लक्‍झरीअस ड्यूअल-टोन आयव्‍हरी आणि ब्‍लॅक इंटीरिअर्स
  • प्रीमियम लेदरेट डोअर लायनिंग्‍ज
  • प्रीमियम लेदरेट आयपी पॅनेल
  • रिथमिक अॅम्बियण्‍ट लाइट्स – ७ रंग
  • अॅपेक्‍स एडिशन सिग्‍नेचर सीट कव्‍हर्स आणि कूशन्‍स

या सुधारणा एलीव्‍हेट व्‍ही आणि व्‍हीएक्‍स ग्रेड्ससाठी अॅपेक्‍स एडिशन पॅकेज* म्‍हणून उपलब्‍ध आहेत, ज्‍यामुळे विविध ग्राहक पसंतींची पूर्तता होते. तसेच या सुधारणा फक्‍त मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध आहेत.

किंमत रूपयांमध्‍ये:

होंडा एलीव्‍हेटस्‍टॅण्‍डर्ड व्‍हेरिएण्‍टएक्‍स-शोरूम(दिल्‍ली) मर्यादित कालावधीसाठी अॅपेक्‍स एडिशनची प्रभावी किंमत  (दिल्ली)
व्‍हीएमटी१२,७१,०००१२,८६,०००
व्‍हीसीव्‍हीटी१३,७१,०००१३,८६,०००
व्‍हीएक्‍स एमटी१४,१०,०००१४,२५,०००
व्‍हीएक्‍स सीव्‍हीटी१५,१०,०००१५,२५,०००

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content