Homeडेली पल्सडोंबिवलीतले अतिधोकादायक रसायनिक...

डोंबिवलीतले अतिधोकादायक रसायनिक कारखाने जाणार दूर..

डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल जाहीर केले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीत काल दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मिळताच कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांच्या कुटुंबियांना खासदार शिंदे यांनी धीर दिला. या स्फोटातील जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेण्यासोबतच स्फोटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना पंचनामा करून आठवडाभरात नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसीत वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि त्यामुळे रहिवासी भागाला निर्माण झालेला धोका लक्षात घेत डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचे ए, बी, सी असे वर्गीकरण करून अतिधोकादायक कंपन्यांचे शहराबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसेचे आमदार राजू पाटील, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

डोंबिवली

Continue reading

रविवारी आनंद घ्या राधिका जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर...

‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्रीरंग फडके यांनी लिहिलेल्या ‘रानसावल्या’, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर येथे होत आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक आयुक्त...

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....
Skip to content