हिरो मोटोकॉर्पने हर्षवर्धन चितळे यांना कंपनीचा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त केले आहे. हे पद ते ५ जानेवारी २०२६पासून सांभाळतील. सध्या हे पद विक्रम कसबेकर सांभाळत असून ते हे पद सोडतील. मात्र, ते कंपनीत तंत्रज्ञानप्रमुख (Chief Technology Officer) आणि कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून काम करत राहतील.
चितळे यांचा अनुभव
चितळे यांनी सिग्निफाय या युरोपियन लाइटिंग कंपनीत “Global CEO, Professional Business” या पदावर काम केले आहे. त्याद्वारे त्यांनी देशांतले सुमारे १२ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताळले आहे. बरीच उत्पादने व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प यांचाही त्यांना अनुभव आहे. तसेच त्यांनी फिलिप्स लाइटिंग इंडिया, HCL Infosystems आणि Honeywell Automation India यासारख्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ नेतृत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हिरोचा दृष्टीकोन कोणत्या दिशेने?
हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन मुंजाळ यांच्या मते, चितळे यांच्या नेतृत्त्वाखाली हिरो पुढे “इलेक्ट्रिक मोबिलिटी, नव्या मोबिलिटी सोल्यूशन्स, प्रीमियम उत्पादनं, डिजिटायझेशन, आणि शाश्वततेच्या दिशेने” वेगाने वाटचाल करेल, अशी माहिती रवींद्र खांडेकर यांनी दिली.