Homeचिट चॅटहरमित सिंग ठरला...

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस… मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने वेगळीच उंची गाठली. या अटीतटीच्या पोझयुद्धात आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीरसौष्ठवपटू हरमित सिंग ‘खासदार श्री’चा किंग ठरला. त्याने मुंबई श्रीचा किताब पटकावणार्‍या उमेश गुप्ता, नीलेश दगडे, नीलेश रेमजे, अक्षय मोगरकर यांचे कडवे आव्हान मोडून काढत स्पर्धेवर आपले नाव कोरले.

पियुष गोयल यांच्या पुढाकारातून स्पर्धा संयोजक आणि निमंत्रक कुणाल केरकर यांनी खासदार खेळ महोत्सवानिमित्त खासदार श्रीचे दिमाखदार आयोजन करून खेळाडू आणि क्रीडाप्रेमींची मने जिंकली. बोरिवली पश्चिमेकडील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंनी विक्रमी सहभाग नोंदवला. पाच लाखांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसे असलेली ही स्पर्धा साधीसुधी नव्हती. या स्पर्धेत एक लाख रुपयांच्या अव्वल बक्षिसासाठी जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. खेळाडूंना प्रोत्साहन देणार्‍या या स्पर्धेत संपूर्ण मुंबईतील जिम संस्कृती मंचावर अवतरली होती. प्रत्येक वजनी गटात ४० ते ५० खेळाडूंची गर्दी पाहून प्रेक्षकही अवाक झाले. परीक्षकांनाही निकाल जाहीर करताना अक्षरशः डोळ्यात तेल घालून निर्णय घ्यावे लागले. प्रत्येक गटात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. खेळाडूंसह प्रेक्षकांची गर्दी इतकी अद्भूत होती की आत मुंगी शिरायलाही जागा नव्हती. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा गजर आणि प्रत्येक पोझवर उसळणारी दाद यामुळे संपूर्ण मैदान भारावून गेले होते. ‘खासदार श्री’च्या लढतीत अखेरच्या क्षणापर्यंत थरार कायम होता. प्रत्येक गटातून अव्वल पाच आणि नंतर गटविजेता काढताना जजेसनाही अक्षरश: घाम फुटत होता. एकापेक्षा एक आणि बलाढ्य खेळाडूंच्या पीळदार युद्धात हरमित सिंगने उमेश गुप्ता, निलेश दगडे आणि संदीप सावळे यांना मागे टाकत विजेतेपदावर आपला हक्क सांगितला.

मुख्य शरीरसौष्ठवाप्रमाणे मेन्स फिजिक फिटनेस गटातही स्पर्धकांच्या सहभागाने सेंच्युरी गाठत विक्रम केला. या दोन गटांच्या स्पर्धेतील १६५ सेमी गटात अनिश शिंदे, तर १६५ सेमीवरील गटात बॉबी पाटील विजेता ठरला. खासदार श्रीचे मुख्य आकर्षण असलेल्या महिला शरीरसौष्ठव गटात चक्क नऊ खेळाडूंचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. या गटात लवीना नरोन्हाने अव्वल स्थान पटकावत उपस्थितांची वाहवा मिळवली. थोडक्यात सांगायचे झाले तर ही स्पर्धा म्हणजे केवळ शरीरसौष्ठव नव्हे, तर मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा आगळावेगळा महोत्सव ठरला. या नजर लागण्याजोग्या फिटनेस सोहळ्याचा बक्षीस वितरण सोहळा पियुष गोयल, बृहनमुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, बाळा तावडे, अमर शाह आणि स्पर्धा संयोजक कुणाल केरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल

५५ किलो वजनी गट: १. जीवन सूर्यवंशी (स्ट्रेंथ यार्ड), २. रुनिक शिर्के (मसल बिल्ड), ३. राहुल भारद्वाज (एबी फिटनेस), ४. संचेक धुळे (बी फिटनेस), ५. आनंद वाघ (जेडी फिटनेस).

६० किलो वजनी गट: १. हनुमान भगत (शेळके जिम), २. गणेश पाटील (फिजिक जिम), ३. धर्मराज जमादार (एमजे २२), ४. निशांत नांदिवडेकर (दत्तगुरु जिम), ५. यश महाडिक (सालम जिम).

६५ किलो वजनी गट: १. संदीप सावळे (परब फिटनेस), २. सुयश सावंत (शिवशक्ती), ३. निखिल सावंत (आयक्यू फिटनेस), ४. हिमांशू मकवाना (बॉडी वर्कशॉप), ५. याज्ञिक मांदाडकर (अपूर्व जिम).

७० किलो वजनी गट: १. उमेश गुप्ता (युजी फिटनेस), २. साजिद मलिक (विराज फिटनेस), ३. उदेश ठाकूर (रूद्रा फिटनेस), ४. अमन भौमिक (बॉडी वर्कशॉप), ५. आकाश घोरपडे (बॉडी वर्कशॉप).

७५ किलो वजनी गट: १. एम. के. राजू (स्ट्रेंथ यार्ड), २. विशाल धावडे (बालमित्र जिम), ३. सुरेंद्र नाईक (परब फिटनेस), ४. नदीम अन्सारी (सावरकर चीन), ५. निहाल भुवड (ड्रीम फिटनेस).

८० किलो वजनी गट: १. पवन डंबे (श्री दत्तगुरु), २. रितिक पालव (बॉडी वर्कशॉप), ३. नैतिक गांधी (संध्या फिटनेस), ४. अमन चौमन (फिटनेस फॅक्टरी), ५. हार्दिक अंबीरे (आयक्यू फिटनेस).

मेन्स फिजिक १६५ सेमी: १. अनिश शिंदे (विराज फिटनेस), २. सागर शहा (शिवशक्ती), ३. महेश नॅन्सी (जीम), ४. ब्रॅण्डन डिसोजा (परब फिटनेस), ५. विशाल नांदिवडेकर (दत्तगुरु जिम).

मेन्स फिजिक १६५ सेमी वरील: १. बॉबी पाटील (वेलनेस जिम), २. संतोष पुजारी (सद्गुरु फिटनेस), ३. संकेत शिगवण (फिट अँड फाइन), ४. शुभम यादव (हार्डकोर जिम), ५. दर्शन फुलावरे (डी फिटनेस).

महिला शरीरसौष्ठव: १. लवीना नरोन्हा (जे नाईन)२. राजश्री मोहिते (केनझो फिटनेस), ३. पूजा चोटमल (माँसाहेब), ४.मानसी हांडे (ट्रू पावर जिम), ५. आरती बनसोडे (माँसाहेब).

खासदार श्री विजेता: हरमित सिंग, उपविजेता: उमेश गुप्ता, द्वितीय उपविजेता: संदीप सावळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...

सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

मुंबईतल्या सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायिक अधिकारी पवन तापडिया आणि उत्तर विभाग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला....
Skip to content