Homeचिट चॅटवस्ताद वसंतराव पाटील...

वस्ताद वसंतराव पाटील यांना गुरुवर्य मल्लगुरु पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा फाऊंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५चे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदरचे सर्वेसर्वा वसंतराव य. पाटील यांना यंदाचा गुरुवर्य मल्लगुरू पुरस्कार खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी शिक्षणरत्न पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. आर. एस. साळुंखे, उद्योगरत्न पुरस्कारप्राप्त प्रशांत आनंदराव पाटील, कृषिरत्न पुरस्कारप्राप्त प्रतापराव शिवाजीराव मोहिते-पाटील, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पैलवान नजरुद्दीन नायकवडी व प्रतिष्ठा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा तानाजी राजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रियांका भगत, नीता मोरे, नलिनी पाटील यांनादेखील क्रीडारत्न पुरस्कार देण्यात आला. वसंतराव पाटील गेली चार दशके कुस्ती खेळात कार्यरत असून अनेक युवा मल्ल घडवण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे.

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content