Homeडेली पल्समुंबई विमानतळावर 11...

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले.

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम वजनाचा, 9.662 कोटी रुपये किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त केला. दुसऱ्या प्रकरणात वन्यजीव (जिवंत आणि मृत प्राणी) जप्त करण्यात आले. यात रॅकून (1 जिवंत, 3 मृत), 3 मृत काळ्या खारी (ब्लॅक फॉक्स स्क्विरल) आणि 29 जिवंत तसेच 8 मृत हिरवे सरडे (ग्रीन इग्वाना) यांचा समावेश आहे. तिसऱ्या प्रकरणात 1.650 किलोग्रॅम वजनाचे, 1.49 कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणांमध्ये अंमली पदार्थविरोधी कायदा, वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि सीमाशुल्क कायद्यानुसार कारवाई केली गेली. या सर्व प्रकरणांमध्ये मिळून 4 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर, बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका भारतीय नागरिकाची तपासणी केली. या प्रवाशाच्या सामानाची आणि वैयक्तिक झडती घेतली असता, त्याच्याकडे 9662 ग्रॅम वजनाचा (अंदाजे बाजार मूल्य 9.662 कोटी रुपये) गांजा (हायड्रोपोनिक वीड) सापडला. हा गांजा प्रवाशाने स्वतःसोबत आणलेल्या सामानात लपवण्यात आला होता. अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली या प्रवाशाकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे असलेल्या सामानात वन्यजीव (जिवंत आणि मृत प्राणी) आढळून आले. जप्त केलेले प्राणी भारतातील स्थानिक प्रजातीचे नसल्यामुळे, त्यांच्या जीविताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे सर्व प्राणी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन, त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ देशात पाठवले गेले. या प्रवाशाविरुद्ध सीमाशुल्क तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमाखाली कारवाई करण्यात आली. या   प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

तिसऱ्या प्रकरणात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दुबईहून मुंबईत आलेल्या 2 प्रवाशांची तपासणी केली. त्यांच्याकडे तस्करी केले जात असलेले आणि मेणाने झाकून ठेवलेले एकूण 1.650 किलोग्रॅम वजनाचे आणि 1.49 कोटी रुपये मूल्याचे, भुकटीच्या स्वरूपातील (Gold Dust) तसेच तुकड्यांच्या स्वरुपातील 24 कॅरेट सोने आढळले. हे प्रवासी शरीरात (body cavity) तसेच खिशात लपवून या सोन्याची तस्करी करत होते. याप्रकरणी दोघाही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content