Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या तरण तलाव...

मुंबईतल्या तरण तलाव ते मैदानांची माहिती मिळवा 18001233060 क्रमांकावर

मुंबईकरांना घरबसल्या विविध सोयीसुविधांची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नि:शुल्क हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 18001233060 हा या हेल्पलाईनचा क्रमांक असून यावर नागरिकांना पालिकेच्या अखत्यारितील तरण तलाव, विविध नाट्यगृहे, सभागृहे, उद्याने, मैदाने आदींबाबत माहिती उपलब्ध होऊ शकेल. अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते नुकताच या हेल्पलाईनचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.

मुंबईकरांना विविध नागरी सोयीसुविधा सुलभ पद्धतीने मिळवता याव्यात, यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे तसेच उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ही नि:शुल्क हेल्पलाईनसुद्धा याच उपाययोजनांचा एक भाग आहे. 

18001233060 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधून नागरिक पालिकेच्या विविध उपक्रमांबाबतची माहिती घेऊ शकतात. त्यामध्ये तरण तलावाच्या सभासद नोंदणीची सद्यस्थिती आणि नोंदणीसाठी करावयाच्या प्रक्रियेची माहिती; वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (पूर्वीची राणी बाग) येथे भेट देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने काढावयाच्या तिकिटांचे आरक्षण करताना येणाऱ्या समस्यांबद्दल माहिती व निराकरण; महापालिकेची विविध नाट्यगृहे, सभागृहे, उद्याने, मैदाने यांच्या आरक्षणाची सद्यस्थिती, शुल्क, आरक्षणाची प्रक्रिया तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागासंबंधित माहिती आदींचा समावेश आहे. हेल्पलाईनमध्ये कार्यरत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना ही माहिती पुरविण्यात येईल.

या हेल्पलाईनला नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा आढावा घेऊन आगामी काळात पालिकेच्या अन्य खात्यांशी संबंधित माहिती व मार्गदर्शन सदर हेल्पलाईनवर उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती समन्वयक (क्रीडा व मनोरंजन) संदीप वैशंपायन यांनी दिली आहे. 

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content