Homeटॉप स्टोरी१ मेपासून शैक्षणिक...

१ मेपासून शैक्षणिक साहित्य मिळवा नाममात्र दरात!

भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीच्या ज्ञानसंवर्धनासाठी लागणारी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तके अधिक स्वस्तात उपलब्ध होण्याकरीता येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मेपासून (येत्या गुरूवारपासून) टपाल खात्यातर्फे ‘ज्ञान पोस्ट’ नावाची सेवा सुरू करण्यात येत आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सेवेसाठी राजपत्र अधिसूचनेच्या प्रकाशनाची काल घोषणा केली.

शैक्षणिक

भारतीय टपाल कार्यालयांद्वारे पुस्तके व अध्ययन साहित्य परवडणाऱ्या दरात पोहोचवण्यासाठी ही नवी सेवा आहे. ज्ञान पोस्ट, ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण वितरण यंत्रणा राहणार आहे. या सेवेचा उद्देश संपूर्ण भारतात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तके अधिक परवडणाऱ्या दरात वितरित करणे हा आहे. ही सेवा शिक्षणाला पाठिंबा देण्याबाबतच्या भारताच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे.

शिक्षण ही मजबूत भविष्यासाठीची पायाभूत गोष्ट आहे. मात्र शिकण्याच्या साधनांपर्यंतची पोहोच भौगोलिक स्थान किंवा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असू नये, यादृष्टीने ‘ज्ञान पोस्ट’ ही सेवा तयार करण्यात आली आहे, जेणेकरून कोणतेही पाठ्यपुस्तक, तयारी मार्गदर्शक किंवा सांस्कृतिक पुस्तक शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे अगदी दुर्गम खेड्यांपर्यंतही पोहोचू शकेल, असा विश्वास सिंधिया यांनी यावेळी व्यक्त केला. अभ्यास आणि ज्ञानवाटपाला मदत करण्यासाठी ‘ज्ञान पोस्ट’ सेवा परवडणाऱ्या दरात पुस्तके आणि मुद्रित शैक्षणिक साहित्य भारतातील विस्तृत टपाल जाळ्यातून पाठविण्याचा पर्याय देते. ही सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीकोनातून याचे दर आकारण्यात येणार आहेत. ‘ज्ञान पोस्ट’अंतर्गत पाठवली जाणारी पुस्तके व मुद्रित शैक्षणिक साहित्य पाठपुरावा करण्यायोग्य असेल आणि ते भूमार्गाने पाठवले जाईल, ज्यामुळे खर्च कमी होईल. ही पार्सल सेवा अतिशय परवडणाऱ्या दरात पाठवता येईल. ३०० ग्रॅम वजनाच्या पॅकेटसाठी फक्त २०  रुपयांपासून पाच किलोग्रॅमपर्यंतच्या पाकिटासाठी जास्तीतजास्त १०० रुपयांपर्यंत (कर वगळता) याचा दर असेल. फक्त व्यावसायिक नसलेले शैक्षणिक साहित्यच ‘ज्ञान पोस्ट’अंतर्गत पाठवण्यासाठी पात्र असेल. ‘ज्ञान पोस्ट’ सेवा भारतातल्या सर्व विभागीय टपाल कार्यालयांमध्ये १ मे २०२५पासून कार्यान्वित होईल. अधिक माहितीसाठी जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधावा किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Continue reading

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...

लाभ घ्या आयुष्मान भारत आणि म. फुले जनआरोग्य योजनेचा

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले...

एमआयजी क्रिकेट क्लबची राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 27 ते 29 सप्टेंबर 2025दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पाश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या...
Skip to content