Homeमुंबई स्पेशलमुंबईतली उद्याने ठरताहेत...

मुंबईतली उद्याने ठरताहेत अनेकांना संजीवनी!

मुंबई महानगरासारख्या अत्यंत घनदाट लोकसंख्येच्या, अरुंद वसाहतींच्या शहरात मधुमेह व तत्सम आजाराने ग्रस्त नागरिकांना व्यायाम, चालणे, धावणे यासारख्या आरोग्यदायी सेवासुविधा मिळाव्यात म्हणून मुंबई महापालिकेच्या उद्यान

विभागाने सुमारे ४८८ खुल्या ठिकाणी व्यायामाची साधने उपलब्ध करून दिली आहेत. बहुतांश उद्यानांमध्ये जॉगिंग ट्रॅक, पदपथ, योगा व ध्यानधारणा केंद्र यासारख्या सुविधा विनामूल्य उपलब्ध असल्याने मधुमेहासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी त्या जणू संजीवनीच ठरत आहेत.

योग्य आहारासोबत नेटकी जीवनशैली व दिनचर्या तसेच दररोज चालणे, धावणे यासह वैद्यकीय तज्ज्ञांनी सुचवलेले व्यायाम करणे शारीरिक तंदुरूस्तीकरीता महत्त्वाचे ठरते. मुंबईसारख्या महानगरात जवळपास सर्वच नागरिकांचा जीवनक्रम अत्यंत धावपळीचा व दगदगीचा असतो. त्यातच महानगराच्या भौगोलिक मर्यादांमुळे प्रत्येकाला व्यायामाच्या

सेवासुविधा मिळतातच, असे नाही. अशा स्थितीत पालिका प्रशासनाने उद्यान विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सर्व परिसरांमध्ये उद्याने, खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने यांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सद्यस्थितीत उद्यान विभागाच्या अखत्यारित एकूण १ हजार ६८ भूभाग आहेत. मागील चार ते पाच वर्षांपासून विविध उद्याने, मनोरंजन मैदाने आणि खेळांची मैदाने येथे खुली व्यायामाची उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आजपर्यंत सुमारे ४८८ ठिकाणी अशी उपकरणे लावण्यात आली आहेत. त्यात आणखी वाढ करण्याचे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आणि उपायुक्त (उद्याने) रमाकांत बिरादार यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या बहुतांश उद्यानांचा, मैदानांचा विकास करताना व्यायामाच्या उपकरणांसह जॉगिंग ट्रॅक, पदपथ, योगा आणि ध्यानधारणा केंद्र यांचाही आवर्जून समावेश केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळ-सायंकाळ चालणे, धावणे यासारखे आरोग्यदायी फायदे विनामूल्य व घराजवळ सहजरित्या उपलब्ध झाले पाहिजेत. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तीन विभागांमध्ये सर्वत्र या सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील, याकडे लक्ष दिले जात आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content