शिवसेनेचे नेते, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचे आज, रविवारी पहाटे साडेतीन वाजता वयाच्या ८२व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांचे निवासस्थान- स्नेहदीप, पहाडी रोड नं. २, आरे मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ६३ येथे सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत ठेवण्यात येईल. त्यानंतर पार्थिवावर शिवधाम स्मशानभूमी, पश्चिम द्रूतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) येथे अंत्यसंस्कार केले जातील.
गेल्या काही दिवसांपासून मेघना कीर्तिकर कर्करोगाने आजारी होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पती गजानन कीर्तिकर, मुलगा अमोल कीर्तिकर, मुली गौरी आणि हर्षदा असा परिवार आहे.