पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी दीर्घ आजारानंतर कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. श्वासोच्छवासाच्या त्रासावरील उपचारांसाठी त्यांना जुलै महिन्यातच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
ज्योती बाशूनंतर २००० ते २०११ या काळात भट्टाचार्य पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. प्रकृती आस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. २०१५मध्ये त्यांनी सीपीआय (एम)च्या पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.