Homeन्यूज ॲट अ ग्लांस'लाडक्या बहिणीं'साठीः ३१...

‘लाडक्या बहिणीं’साठीः ३१ डिसेंबरपर्यंत करा ई-केवायसी!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेला ३१ डिसेंबर २०२५पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याआधी आजपर्यंत म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२५पर्यंत ही मुदत होती.

नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य होत आहे. ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. पात्र महिलांना न्याय मिळावा आणि तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये याकरिता ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

Continue reading

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी होती अशी फुलांची सजावट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल झालेल्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दादरच्या शिवाजीपार्क येथील स्मृती स्थळावर विविध फुलझाडांनी तसेच शोभिवंत झाडांनी सजावट केली होती. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मांडणी करण्यात आली. यामध्ये सफेद आणि पिवळ्या रंगाच्या...

ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा झाले ‘जॉली अँड पॉली’!

भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना 'जॉली' आणि 'पॉली' या दोन विशिष्ट भूमिकांमध्ये सादर करण्यात आले आहे,...

‘तिसऱ्या मुंबई’ची दावोसमध्ये मुहूर्तमेढ! रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा!!

मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगड-पेण परिसरात 'तिसरी मुंबई' आकारात येत आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्या मुंबईतले पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य...
Skip to content