Homeबॅक पेजरत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय...

रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गतच!

महाराष्ट्र सरकारच्या एका अहवालानुसार राज्यात 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनार असून राज्यातील 72% मत्स्य उत्पादन कोकण क्षेत्रात होते. कोकणतल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत मत्स्य महाविद्यालय असून, मत्स्य विज्ञानात पदवी आणि पदव्युत्तर तसेच पीएचडी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचा नागपूर येथील पशु विज्ञान विद्यापिठाशी जोडण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचा नागपूर येथील पशु विज्ञान विद्यापिठाशी जोडण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रूपाला यांनी लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. या संबधीचा अतारांकित प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला होता.

याशिवाय भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (सीआयएफई) या देशातील मत्स्य विज्ञानक्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहेत. त्या महाराष्ट्रासह देशात उच्च शिक्षण प्रदान करतात असे रुपाला यांनी सांगितले.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content