Homeएनसर्कलआता स्वप्नातले घर...

आता स्वप्नातले घर शोधा ‘थ्रीडी’मध्ये!

हाऊसिंग डॉटकॉमने त्यांच्या ग्राहकांसाठी घरखरेदीचा अनुभव अधिक सुलभ करताना नेक्स्ट-जेन थ्रीडी, एआर आणि व्हीआर इनोव्हेशन्ससह व्हिज्युअलाइझेशनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

हाऊसिंग डॉटकॉम या भारताच्या आघाडीच्या रियल इस्टेट अॅपने एक दशकापूर्वी थ्रीडी, ऑग्मेन्टेड रियालिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) टूल्स दाखल करून घरखरेदीच्या अनुभवात बदल घडवून आणला होता. त्या आधारावर, आता त्याच टेक्नॉलॉजीचा नेक्स्ट-जनरेशन टप्पा लॉन्च केला आहे आणि घराचा, मालमत्तेचा शोध घेण्याचा अधिक आकर्षक आणि ऑटोमेटेड अनुभव प्रदान केला आहे.

हाऊसिंग डॉटकॉमचे उत्पादन प्रमुख संगीत अग्रवाल म्हणतात की, ही व्हिज्युअलाइझेशन टूल्स आमच्या यूझर्सना एक अर्थपूर्ण अनुभव प्रदान करून मूल्यवर्धन करतात. ही आकर्षक आणि इंटरॅक्टिव्ह टूल्स प्रदान करून आम्ही ग्राहकांना मालमत्तेचा असा अनुभव देत आहोत की जणू ती वास्तू प्रत्यक्ष त्यांच्यासमोर उभी असावी. यामुळे व्हर्च्युअल निरीक्षण करून ग्राहक प्रत्यक्ष निर्णय घेऊ शकतात. आम्ही मशीन लर्निंग आणि आर्टिफिश्यल इंटेलिजन्सचा उपयोग करून आमचे संचालन आणि यूझरचा अनुभव या दोन्हीत सुधारणा करण्याबाबत वचनबद्ध आहोत. या तंत्रज्ञानाच्या अभिनव अंमलबजावणीचा निरंतर शोध घेऊन आम्ही फक्त आमची कार्यक्षमता सुधारत नाही, तर बाजारपेठेत त्याचा स्पर्धात्मक फायदादेखील मिळवत आहोत.

थ्रीडी

डीजीएआर आणि डीजीटूर ही दोन मुख्य एआर आणि व्हीआर इनोव्हेशन्स या आकर्षक अनुभवात भर घालतात. डीजीएआर हे एक ऑग्मेन्टेड रियालिटी सोल्यूशन आहे, जे खरेदीदारांना विकासकाने कल्पिलेल्या मालमत्तेच्या डिझाईनचा संपूर्ण थ्रीडी प्रोटोटाइप दाखवते. वेबएआरमार्फत अॅक्सेसिबल असलेल्या डीजीएआरच्या मदतीने यूझर प्रत्यक्ष भूखंडावर डिजिटल मालमत्तेच्या प्रतिकृतीची कल्पना करू शकतो आणि यामुळे शोध अनुभवाला अत्यंत इंटरॅक्टिव्ह आणि जिवंत परिमाण मिळते. यात आणखी पुढची पायरी गाठत व्हीआरमधील डीजीटूर हे पोझ ट्रॅकिंग आणि नियर-आय थ्रीडी डिस्प्लेजचा उपयोग करून मालमत्तेत व्हर्च्युअल फेरफटका मारण्याचा एक अत्यंत आकर्षक अनुभव प्रदान करते आणि मालमत्तेत प्रत्यक्ष उपस्थित न राहता खरेदीदार ती मालमत्ता बारकाईने पाहू शकतो. दूर राहणाऱ्या ग्राहकांना, कोणताही निर्णय घेण्याअगोदर मालमत्ता व्यवस्थित बघता यावी यासाठी हे व्हीआर सोल्यूशन विशेष उपयुक्त आहे.

हाऊसिंग डॉटकॉमच्या नेक्स्टजेन थ्रीडी उत्पादनांच्या इनोव्हेटिव्ह क्षमतांचा विस्तार करत, ही नवीन टूल्स आकर्षक रियल इस्टेट अनुभवात एक मापदंड स्थापित करतात. यातील डीजीप्लॉट हे टूल भूखंडाचे व्यापक थ्रीडी दर्शन घडवते आणि मुख्य ठिकाणांपासून (लँडमार्क्स) त्याचे अंतर दाखवत ते भूखंड विकले गेले आहेत की उपलब्ध आहेत याची माहिती देते. डीजीस्लेट एजंट्सना त्या-त्या प्रकल्पाची एक रियल-टाइम इनसाइट देऊन सक्षम बनवते आणि हे एजंट्स जेव्हा आपल्या ग्राहकांना भेटतात त्यावेळी अद्यतन व्हिज्युअल्स सादर करून ते ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकतात.

डीजीपोर्ट आणि ड्रोनव्ह्यू ही टूल्स इंटरॅक्टिव्ह मास्टरप्लान टूर आणि एरियल दृष्टिकोनासह  व्हिज्युअलाइझेशनला एका नवीन पातळीवर घेऊन जातात आणि लेआउट व कनेक्टिव्हिटीचा संपूर्ण बोध करून देतात. एआय आणि चॅटजीपीटीद्वारा संचालित फ्लोअरप्लॅन थ्रीडी या सर्व टूल्सना परिपूर्णता देते आणि २डी ब्लूप्रिंट्सचे तपशीलवार, इंटरॅक्टिव्ह थ्रीडी मॉडेल्समध्ये रूपांतर करून ग्राहकांना त्यांचे भावी घर व्यवस्थित तपशिलात जाऊन बघण्याचा अनुभव देते. यामुळे ग्राहक मालमत्ता विकत घेण्याच्या बाबतीत आत्मविश्वासाने आणि माहितीपूर्ण निर्णय सहजपणे घेऊ शकतात. यामुळे ग्राहकाला त्यात्या मालमत्तेचा व्यवस्थित अंदाज येतो आणि आसपासचा परिसरदेखील स्पष्ट दिसू शकतो. त्यामुळे ग्राहकाचा वेळ आणि पैसा वाचतो.

Continue reading

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...

अमेरिकी कोर्टाचा ट्रम्पना झटका! भारतीय कर्मचारी-विद्यार्थ्यांना दिलासा!!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाला अमेरिकन न्यायालयाने एक मोठा दणका दिला आहे. एच१-बी व्हिसावर नव्याने लावण्यात आलेली तब्बल १ लाख डॉलरची (सुमारे ९५ लाख रुपये) भक्कम फी 'बेकायदेशीर कर' असल्याचे सांगत बोस्टन येथील फेडरल कोर्टाने नुकतीच ती...

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...
Skip to content