Homeचिट चॅट'नेक्सस सीवूड्स'मध्ये उद्यापासून...

‘नेक्सस सीवूड्स’मध्ये उद्यापासून ‘फेस्ट-ओ-बेरी’!

स्ट्रॉबेरी हे अनेकांच्या आवडीचे फळ आहे. काही फळे ही विशिष्ट हंगामातच चाखायला मिळतात. या हंगामी फळांचा आनंद लुटण्यासाठी नवी मुंबई येथील नेक्सस सीवूड्स मॉल येथे ‘फेस्ट-ओ-बेरी’चे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील हा सर्वात मोठा आणि पहिलावहिला ‘फेस्ट-ओ-बेरी’ फेस्टिव्हल उद्या, १० व ११ फेब्रुवारी २०२४, या दोन दिवशी दुपारी २ ते रात्री १० या कालावधीत पार पडेल. स्ट्रॉबेरी प्रेमींसाठी हा फेस्टिवल पर्वणी ठरणार आहे.

फेस्ट-ओ-बेरी फेस्टिव्हलमध्ये ५०पेक्षा जास्त बेरी डिशेस चाहत्यांना चाखायला मिळणार आहेत. लंडनच्या प्रसिद्ध चॉकलेट स्ट्रॉबेरीपासून प्रत्येकाच्या आवडीनुसार बेरी डिशेस येथे मिळणार आहेत. इतर आकर्षणाच्या बाबींमध्ये झिरो डिग्री पॉप्सिकल्समधील बेरी बेरी आइस लॉलीज, क्रॅनबेरी आइस लॉलीज, शेकी वेकीमधील व्हेरी बेरी आइस्क्रीम संडेस, बिटरस्वीट कॅफेमधील स्ट्रॉबेरी स्टिक चॉकलेट, स्ट्रॉबेरी क्रीम चीज शॉट्स यांचा समावेश आहे.

या आकर्षक पदार्थांव्यतिरिक्त, फेस्ट-ओ-बेरीच्या चाहत्यांना लाइव्ह परफॉर्मन्स, तसेच सर्व वयोगटांसाठी अनोखे उपक्रम आणि खेळ अनुभवता येणार आहेत. लहान मुलांना या फेस्टिवलमध्ये स्ट्रॉबेरी फार्मचा अनुभव घेता येणार आहे. तसेच कार्यशाळेच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचा आनंद लुटता येईल. पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या फेस्ट-ओ-बेरी या फेस्टिवलच्या सर्व स्ट्रॉबेरी प्रेमींना हा वेगळा अनुभव घेता येणार आहे, अशी माहिती नेक्सस सीवूड्सच्या व्यवस्थापकीय मंडळाने दिली.

Continue reading

एका फ्लॅटचे दोन करताय? सावधान!

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे दोन भागांत विभाजन करण्याचा विचार करतात. हे एक सामान्य व्यावहारिक वास्तव आहे. पण, मुंबई उपनगरातील...

न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश!

भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांची भारताचे पुढचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. ते 23 नोव्हेंबरला आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश गवई यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत!

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज एक दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार...
Skip to content