Homeकल्चर +रसिकांनी अनुभवले पु....

रसिकांनी अनुभवले पु. लं. आणि बंगालचे साहित्य-सांगीतीक भावबंध!

महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित पु. ल. कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी ‘शोंगित शिल्पी पी. एल. बाबू (पु. ल. आणि बंगाल यांचा साहित्य संगीतमय भावबंध)’ हा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमात रविंद्र संगीतासाठी अरुंधती देशमुख, बाऊल संगीतासाठी डॉ. उत्तरा चौसाळकर यांनी उत्तम रचनांचं सादरीकरण केलं. ज्येष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

धनत्रयोदशीच्या दिवशी या कार्यकमाचं निरुपण करताना धनश्री लेले यांनी आपलं शब्दधन मुक्तकंठाने उधळले. पु. ल. देशपांडे यांचे बंगाली भाषेशी असलेले नाते, त्यातून त्यांना भावलेले साहित्य, गाणी आणि त्यासंदर्भात असलेले अनेक रंजक, मजेदार आणि अनोखे किस्से ह्या कार्यक्रमातून उलगडण्यात आले. पु. लं.च्या व्यक्तिमत्वातील बंगाली साहित्याचा हा अनोखा पदर रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून पत्रसूचना विभागाच्या महासंचालिका मोनिदिपा मुखर्जी उपस्थित होत्या. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका मीनल जोगळेकर यांच्या हस्ते मोनिदीपा मुखर्जी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अनेक भाग व्हायला हवे, इतकी सुंदर कलाकृती आपण सादर केलीत या शब्दात मोनिदिपांनीनी सर्व कलाकारांचे कौतुक केले.

त्यानंतर  ‘पु. ल. एक आनंदस्वर’ हा पु. ल. देशपांडे यांच्या सांगीतिक कारकीर्दीवर आधारित सुरेल संध्याकाळ, या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम ज्येष्ठ गायिका विदुषी आशा खाडीलकर आणि वेदश्री ओक, डॉ. राम पंडित, स्नेहल जोगळेकर, साधना काकटकर, या त्यांच्या सहकलाकारांनी सादर केला. कार्यक्रमाचं समयसूचक निवेदन दिपाली केळकर यांनी केले. दोन्ही कार्यक्रमांसाठी श्रोतृवर्गाला आपल्या शब्दांमध्ये गुंतवून ठेवलं सूत्रसंचालन करणार्‍या मिनीषा वालावलकर यांनी. या दोन्ही कार्यक्रमांसाठी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पु. ल. कला महोत्सव २०२३मध्ये आज शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ५ वाजता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी ‘व्हायोलिनचे रंग-तरंग’ या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सुरांचे अनोखे सादरीकरण करणार आहेत. तद्नंतर सायं. ७ वाजता संस्कार भारती, कोकण प्रांताचे गुणवंत कलाकार महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण ‘लोकरंग दिवाळी संध्या’ या कार्यक्रमात करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम कलांगण येथे होणार आहेत. पु. ल. कला महोत्सवामध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content