बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातर्फे पवई येथील पंडित दिन दयाल उपाध्याय उद्यान तथा अँम्ब्रोशिया गार्डन येथे दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी ‘नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ यांच्यामार्फत ‘एनसीपीए ॲट द पार्क’ हा संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत त्यांच्या अखत्यारित असलेल्या भूखंडांमध्ये नेहमीच वेगवेगळे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून व नागरिकांचा उद्यानातील वावर वाढवा व नवोदित कलाकारांना एक हक्काचा मंच मिळावा यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वीकेंडला सायंकाळी संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. हा कार्यक्रम सर्वांनाच निःशुल्क उपलब्ध होता, अशी माहिती उद्यान विभागाचे प्रमुख उद्यान अधीक्षक जितेन्द्र परदेशी यांनी दिली.