मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या शनिवारी, २३ मार्चला सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध गायक संगीताचार्य पंडित डॉ. मोहनकुमार दरेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. त्यांना तबल्यावर तेजोवृष जोशी आणि संवादिनीवर माधव लिमये साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

डॉ. दरेकर हे केवळ रागसंगीताचे निपुण नसून ते ठुमरी, दादरा, टप्पा, गझल, नाट्यसंगीत, भावगीत आणि भजन यांसारख्या हलक्या शैलीतही सुंदर गातात. यापैकी कोणत्याही एका शैलीच्या सौंदर्यशास्त्राचा भंग न करता विविध घराण्यातील तांत्रिक गुंतागुंत एकत्र करण्याची कला त्याच्याकडे आहे. डॉ. मोहनकुमार दरेकर यांनी परदेशात दुबई, मस्कत, अबुधाबीसह अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहेत. ते राष्ट्रीय संगीत कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय संगीताचे प्रसारण करत असतात.
अधिक माहितीसाठी संपर्क- ०२२-२४३०४१५०.