मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने, भावे कुटुंबियांच्या सौजन्याने तेजश्री आमोणकर यांचे गायन येत्या रविवारी, १५ जूनला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. तेजश्री आमोणकर, गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या नात आहेत.

यावेळी यति भागवत तबला तर ज्ञानेश्वर सोनवणे संवादिनीवर त्यांना साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांंसाठी खुला आहे. अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ७७००९९४४९५, २४३०४१५०