Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या ‘मेलांज’चा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, ५ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता संस्थेच्या सभागारात संगीत दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पं. मिलिंद रायकर यांनी दिग्दर्शन केलेला `मेलांज’ कार्यक्रम सादर केला जाईल. यात रायकर अकॅडमी ऑफ व्हायोलिनचे विद्यार्थी आणि बॉम्बे स्ट्रिंग्स सहभागी होतील. दिलीप मेजारी व अनुज दणाईत (गिटार), सोहम पराळे (तबला), रितिकेश दळवी (पखवाज), चेतन परब (पर्क्युशन) यांचे सादरीकरण केले जाईल.

संगीत संयोजन डेव्हिड प्रिन्स यांचे असून सूत्रसंचालन रिशा दत्ता यांचे असेल. संगीत संयोजनात रॉकी, डेनिस फर्नांडिस, एलेक्स स्टेल्स यांनीही सहकार्य केले आहे. पाहुणे कलाकार म्हणून आनंद रायकर (अकॉर्डिन), यज्ञेश रायकर (व्हायोलिन) यांचे सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे. अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्टच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे करण्यात आले आहे. जास्तीतजास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

Continue reading

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...
Skip to content