Homeडेली पल्सआशाताईंना देशभरातून भावपूर्ण...

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल असल्याची बातमी समजताच चिंता व्यक्त केली होती आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह देशभरातील नेते, कलाकार आणि जनतेने शोक व्यक्त केला.

आशा भोसलेजींच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. त्या भारताने आजवर निर्माण केलेल्या सर्वात प्रख्यात आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक होत्या. त्यांच्या गाण्यांचे पडसाद पिढ्यानपिढ्या लोकांच्या जीवनात घुमत राहतील. भारतीय सांस्कृतिक वारसा समृद्ध करणाऱ्या त्यांच्या विलक्षण संगीत प्रवासाने जगभरातील लोकांची मने जिंकली. त्यांच्या आवाजात एक कालातीत आकर्षण होते, ज्यात मधुर सुरावटी आणि भावपूर्ण रचनांचा संगम होता. त्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व, पद्मविभूषण आशा भोसलेजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी आहे. – केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी

भारताची ‘मेलडी क्वीन’ आशा भोसलेजी यांचे जाणे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. पार्श्वगायिका म्हणून त्यांनी हजारो चित्रपट व संगीत अल्बम्ससाठी आवाज दिला. पिढ्यान्पिढ्या भारतीयांनी त्यांची गाणी ऐकली आणि गुणगुणली. त्यांच्या गोड सुरांचे प्रतिध्वनी कायमच घुमत राहतील. – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संपूर्ण भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी हा अत्यंत दुःखद क्षण आहे. सर्वात बहुगुणी कलाकारांपैकी एक, आशा भोसले आपल्यातून निघून गेल्या. मंगेशकर कुटुंबाने भारतीय संगीताला अतुलनीय योगदान दिले. लता मंगेशकर यांच्या जाण्याने एक ताऱ्याची हानी झाली होती, आज दुसऱ्या ताऱ्याचीही. सरस्वती माते त्यांच्या आत्म्याला शांती आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. ओम शांती. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महान संगीत प्रतिभावंत आशा भोसले यांच्या निधनाने मी खोलवर दुःखी झाले आहे. पिढ्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या प्रेरणादायी आणि मोहक गायिकेने बंगाली गाणीही गायली होती आणि बंगालमध्येही त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. आम्ही २०१८मध्ये त्यांना ‘बंगाबिभूषण’ पुरस्कार देऊ शकलो, हे आमचे भाग्य. त्यांच्या कुटुंबाला आणि जगभरातील लाखो चाहत्यांना माझ्या हार्दिक संवेदना. – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या अद्वितीय गायकीने भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेले. त्यांचे मधुर स्वर देशवासीयांच्या मनात सदैव गूंजत राहतील. भगवान राम त्यांच्या आत्म्याला शांती देतील. – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

भारतीय संगीताला वैश्विक ओळख देणारी आमची प्रिय आशाताई यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांचे कला जगातील योगदान अविस्मरणीय राहील. प्रभू त्यांच्या आत्म्याला चिरशांती देतील. – आचार्य बालकृष्ण (पतंजली)

आशा भोसलेजी यांच्या जाण्याच्या बातमीने मन खोलवर दुखावले. त्यांचा जादुई आवाज अनेक दशकांपासून भारतीय सिनेमाची धडकन होता आणि कोट्यवधी हृदयांना स्पर्श करणारा होता. त्यांचा वारसा पिढ्यानुपिढ्या कायम राहील. ओम शांती. – आरआरआर चित्रपटाचे सुपरस्टार ज्युनियर एनटीआर

प्रथम लता मंगेशकर, आता आशा भोसले. भिन्न शैली, दोघीही महानतेने स्पर्शलेल्या. रफी, किशोर, मुकेश, मन्ना डे, तलत, गीता दत्त, लता आणि आशा- या महान युगाचा शेवटचा दुवा आता निघून गेला. ‘युगाचा अंत’ हा शब्दप्रयोग आपण सहज करतो, पण खरोखरच हा एका युगाचा अंत आहे. – क्रिकेट समालोचक हर्षा भोगले

आज एक युग संपले. आशा भोसले यांचा आवाज आमच्या बालपणीच्या काळाचा भाग होता. त्यांचे गाणे ऐकून आम्ही मोठे झालो. भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई. – युवराज सिंह (माजी क्रिकेटपटू)

परदेशातून उमटला शोक – पाकिस्तानशी होता जिव्हाळ्याचा संबंध

आशाताईंचे संगीत केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी २००६मध्ये पाकिस्तानी चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड केले होते आणि पाकिस्तानी पॉप गायक जावेद अहमद यांच्यासोबत ‘दिल के तार बजे’ हे गाणे गायले होते, जे संगीत चार्ट्सवर अव्वल स्थानी राहिले होते. प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अदनान सामी यांच्या संगीत प्रवासाला आशाताईंनीच दिशा दिली होती. ते अवघे १० वर्षांचे असताना आशाताईंनी लंडनमध्ये त्यांची प्रतिभा हेरली आणि संगीत क्षेत्रात करिअर करण्याचे प्रोत्साहन दिले. मोठेपणी अदनान सामी व्यावसायिक गायक झाल्यावर आशाताईंनी त्यांच्यासोबत ‘कभी तो नज़र मिलाओ’ आणि ‘बरसे बादल’ हे गाजलेले अल्बम केले होते.

आंतरराष्ट्रीय कीर्ती – जगाने केला नमन

आखाती देशांतही आशाताईंच्या निधनाने शोककळा पसरली. त्यांची ‘आशाज्’ ही रेस्तराँ साखळी दुबई, कुवेत, अबुधाबी, बहरीन आणि कतार येथे आजही सुरू आहे. जगाच्या कानाकोपऱ्यांतून चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content