Saturday, December 21, 2024
Homeबॅक पेजइझमायट्रिपचा अॅनिव्‍हर्सरी सेल...

इझमायट्रिपचा अॅनिव्‍हर्सरी सेल सुरू

इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपला १६वा अॅनिव्‍हर्सरी सेल सुरु केला असून त्यात प्रवास सेवांच्‍या सर्वसमावेशक श्रेणीवर मोठ्या सूटचा समावेश आहे. ११ जून २०२४पर्यंत चालणाऱ्या या स्‍पेशल सेलचा प्रवाशांना विमाने, हॉटेल्‍स, बस तिकिटे, कॅब रेण्‍टल्‍स आणि हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक डिल्‍स मिळू शकतील.

१६व्‍या अॅनिव्‍हर्सरी सेलदरम्‍यान ग्राहक विमानांवर जवळपास ७५०० रूपये सूट, हॉटेल्‍सवर जवळपास १०,००० रूपये सूट, बसेसवर जवळपास १५ टक्‍के सूट, कॅब्‍सवर जवळपास १२ टक्‍के सूट, ट्रेन्‍सवर जवळपास १० टक्‍के त्‍वरित कॅशबॅक, हॉलिडेजवर ६०,९९० रूपयांतर्गत आंतरराष्‍ट्रीय प्रवास आदीचा आनंद घेऊ शकतात.

या सवलतीचा आनंद घेण्‍यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्‍या माध्‍यमातून बुकिंग करताना कूपन कोड इएमटी१६चा वापर करू शकतात. तसेच, आयसीआयसीआय बँक, बॉबकार्ड, अमेरिकन एक्‍स्‍प्रेस, आरबीएल बँक व एचएसबीसी बँक अशा निवडक बँक सहयोगींसह बुकिंग करत

इझमायट्रिप

वापरकर्ते अधिक सूटचा लाभ घेऊ शकतात. सेलला अधिक उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी सेल कालावधीदरम्यान करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक व्‍यवहारावर तुम्‍हाला वाइल्‍डक्राफ्ट, पीव्‍हीआर, द मॅन कंपनी, सॅम अँड मार्शल आणि ग्रोफिटर अशा निवडक ब्रँड सहयोगींकडून स्‍पेशल गिफ्ट्स जिंकण्‍याचीही संधी आहे.

सेलच्या कालावधीदरम्‍यान सर्वाधिक खरेदी करणाऱ्या व्‍यक्‍तीला इझमायट्रिपचा स्‍पेण्‍डवेस्टिंग पार्टनर मल्‍टीपलकडून आयफोन १५ मिळेल, जेथे तुम्‍ही भावी प्रवास संबंधित खर्चांसाठी गुंतवणूक करू शकता आणि म्‍युच्‍युअल फंड्स रिटर्न्‍स + फ्लॅट १२ टक्‍के अतिरिक्‍त सूट मिळवू शकता. यानंतरच्‍या सर्वाधिक खरेदी करणाऱ्या व्‍यक्‍तींना वनप्‍लस १२, वनप्‍लस नॉर्ड, बोस साऊंडलिंक आणि वनप्‍लस इअरफोन्‍स अशी बक्षिसे जिंकण्‍याची संधी असेल. काही भाग्‍यवान विजेत्‍यांना ट्रॉली सेट्स, ग्रोफिटर हॅम्‍पर्स, सॅम अँड मार्शलचे ग्रिसिओ विगर सनग्‍लासेस् असे गिव्‍हअवेज आणि सहभागी ब्रँड सहयोगींकडून पीव्‍हीआर चित्रपट तिकिटांवर सूट मिळवण्‍याची संधी असेल.

इझमायट्रिपचे सहसंस्‍थापक रिकांत पिट्टी म्‍हणाले की, इझमायट्रिप १६वे वर्ष साजरे करत असताना आमच्या बहुमूल्‍य ग्राहकांसाठी विशेष क्‍यूरेटेड अॅनिव्‍हर्सरी सेलची घोषणा करताना आनंद होत आहे. आम्‍ही प्रवासाला अधिक अविश्‍वसनीय व उपलब्‍ध होण्‍याजोगे करण्‍यासाठी गेस्‍चर म्‍हणून या यशाला साजरे करण्‍यासाठी विमाने, हॉटेल्‍स, बसेस्, कॅब्‍स आणि हॉलिडे पॅकेजेसवर खास सूट देत आहोत.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content