Homeमाय व्हॉईसफोटोसेशनमध्ये रंगले मानापमानाचे...

फोटोसेशनमध्ये रंगले मानापमानाचे नाट्य!

ग्रुप फोटो काढताना ज्येष्ठ आमदारांना पाच हजारी, तीन हजारी मनसबदारांच्या रांगेत उभे केल्याने तसेच मुख्यमंत्रीच फोटोसाठी न आल्याने विधानसभेत गुरुवारी मानापमानाचे नाट्य रंगले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरमधील हे शेवटचे अधिवेशन असल्याने विधानसभेच्या सर्व सदस्यांचे समूह छायाचित्र म्हणजेच ग्रुप फोटो घेण्याची परंपरा आहे. या परंपरेमध्ये यंदा प्रथमच मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष उपस्थित न राहिल्याने १०.५० ऐवजी १२ वाजता फोटो घ्यावा लागला आणि मानापमानाचे नाट्य घडल्याने १०.५०चा कार्यक्रम रद्द करून तो बारा वाजता घ्यावा लागला.

मानापमान

विधानसभेत या मानापमानाचे वाग्युद्ध रंगले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह नाना पटोले, जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांनी सरकारला धारेवर धरले. नाही तरी आज फोटो नाही होत तर मंगळवारी समूह छायाचित्र घेऊ, कारण अशोकराव चव्हाण सभागृहात नाहीत, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणीस यांनी सांगितले की, आज सगळे इतके नटूनथटून फोटोसाठी आले आहेत, तर आजच फोटो घेऊ.

नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीच फोटोसाठी आले नाहीत, याबद्दल जाब विचारला. तसेच, मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी राहिली आणि आता तुम्ही कधी फोटो घेणार, असे विचारले. त्यावर फडणवीस म्हणाले की, नाना तुम्ही त्या रिकाम्या खुर्चीवर बसला असता तर आम्ही तुम्हाला फोटोपुरते का होईना पण मुख्यमंत्री मानले असते. त्यानंतर मग १२ वाजता फोटो घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सारे सदस्य फोटोसाठी विधानभवनातील पायऱ्यांवर जमा झाले. तेव्हा मात्र खेळीमेळीच्या वातावरणात छायाचित्रे घेण्यात आली.

मानापमान

छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय श्रीरामच्या घोषणा देत समूह छायाचित्र घेण्यात आले. रोज पायऱ्यांवर विरोधी पक्ष निदर्शने करतात. पण आज समूह छायाचित्राच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षांचे आमदारही घोषणांमध्ये सहभागी झाले होते.

Continue reading

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...

प्रभूजी.. तर मग तुम्ही दिवाळखोरीत!

शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांच्या निवडणूक शपथपत्राचा हवाला देत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत त्यांना विचारले की, सुनील प्रभूजी तुमच्या संपत्तीच्या तुलनेत पंचवीस टक्के इतकी तुमची देणी दिसताहेत. तर मग तुम्ही लवकरच दिवाळखोर होणार का... नादारी जाहीर...

चंद्राची न शिवली गेलेली चड्डी आणि नोकरभरती…

आभाळात चड्डी न घालता दिमाखात वावरणारा आणि अखिल विश्वाचे लक्ष वेधून घेणारा चंद्र आणि महाराष्ट्रातील नोकरभरती याचा काय संबंध आहे? असं विचारलं तर तुम्ही गोंधळात पडाल. पण सध्या रोजच्या रोज विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारे राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
Skip to content