मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे नाट्य व सुगम गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार असून वय वर्षे २५ ते ६५ वयोगटातील अव्यावसायिक गायक कलाकारांनाच यात सहभागी होता येईल.
या स्पर्धेचे अर्ज १४ जानेवारी २०२४ पासून संस्थेच्या कार्यालयात, Facebookवर, twitterवर आणि www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ०२२-२४३० ४१५०, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.