शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या संवाद मेळाव्यात नुकतेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शहरात विविध विकास प्रकल्प मार्गी लागले असून जनहिताची अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांसाठी आपल्याला भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. ही सर्व विकासकामे आपल्याला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रवी पाटील, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, वामन म्हात्रे, महिला आघाडी प्रमुख लता पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जगन्नाथ पाटील यांची घेतली भेट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्प आणि जनहिताच्या कामांबाबत चर्चा केली तसेच लोकसभा निवडणुकीच्याबाबतही संवाद साधला.

ह.भ.प. प्रकाश महाराज म्हात्रे यांचीही घेतली भेट
डॉ. शिंदे यांनी नंतर ह.भ.प. प्रकाश महाराज म्हात्रे यांचीही त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करत त्यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे यांच्यासह शिवसेनेचे आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

चर्चमध्येही उपस्थिती
खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली पश्चिमेतील गणेश नगर चर्चच्या वतीने इस्टर संडेच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या ईश्वर येशू प्रार्थना कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांसमवेत प्रार्थना करत सर्वांना शुभेच्छाही दिल्या.

