Monday, October 28, 2024
Homeचिट चॅटकर्मवीर भाऊराव पाटील...

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. म्हस्के

साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी आज डॉ. ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली.

साताऱ्याच्या डॉ. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या डॉ. म्हस्के यांची नियुक्ती ते पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, या पैकी जे अगोदर होईल त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणिशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी व पीएचडी प्राप्त केली असून गेल्या १९ वर्षांहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.

सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डी. टी. शिर्के यांची २१ ऑक्टोंबर २०२२च्या शासन आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२३ व १३ एप्रिल २०२४च्या राज्यपालांच्या आदेशान्वये पुढील सहा-सहा महिन्यांकरिता त्यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, पुणे येथील भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. म्हस्के यांची निवड जाहीर केली.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content