महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक सावंत यांनी आपला उमेदवारीअर्ज दाखल केला. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांचे शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
सकाळी १०.३० वाजता मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर मंदिरात आशीर्वाद घेऊन उमेदवारीअर्ज भरण्यासाठी डॉ. सावंत शिवसैनिकांसह कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई
येथे पोहोचले. कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे डॉ. सावंत यांनी उमेदवारीअर्ज भरला.
२६ जून २०२४ रोजी महारष्ट्र विधान परिषदेसाठी मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत डॉ. सावंत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून डॉ. सावंत यांचं काम आपण पाहिलं आहे. ते यापूर्वी दोन वेळा पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यापूर्वी विधानसभा सदस्यातून ते निवडून आले आहेत.