Homeपब्लिक फिगरलंडनमधले डॉ. आंबेडकरांचे...

लंडनमधले डॉ. आंबेडकरांचे निवासस्थान अधिक सुंदर करणार!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण मनामध्ये कायम राहीलच. परंतु इथल्या परिसराचे सुशोभिकरण, निवसस्थानातील अंतर्गत व्यवस्था आणखी सुंदर कशी करता येईल, यासाठीचे काम निश्चितपणे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

युरोपमधील अभ्यासदौऱ्यावरील त्यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवस्थानाला भेट दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे संजयकुमार शर्मा, निवासस्थान व्यवस्थापक फहाद उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाला महाराष्ट्र सरकारने शासकीय दर्जा दिला आहे. त्यामुळे येथील उपक्रमात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र सरकारने लोकांना उपलब्ध करून दिली आहे. हे फार चांगले पाऊल महाराष्ट्र शासनाने ऊचलले आहे. सरकारतर्फेही उत्तम निगराणी केली जात आहे. इथे असलेली व्यवस्था आणखी समृद्ध कशी करता येईल यावर आपण काम करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Continue reading

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा झाला भावूक!

गुवाहाटीत काल संध्याकाळी खेळल्या गेलेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानावर चाहत्यांचा प्रतिसाद पाहून रवींद्र जडेजा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, रवींद्र जडेजा खलील अहमदचे चुंबन घेत असलेला एक व्हिडिओही सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. आयपीएल २०२६साठी राजस्थान...

बिहारच्या नालंदात शीतलामाता मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ परिसरातील माता शीतला मंदिरात मंगळवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. यात किमान ९ भाविक ठार, तर इतर अनेक जखमी झाले आहेत. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने व महावीर जयंतीमुळे मंदिरात प्रचंड गर्दी जमली होती. बॅरिकेड्स तुटल्याने...

‘के-पॉप’चे पुनरागमन! एप्रिलपासून ‘अरिरांग’ आणि कॉन्सर्टचे तब्बल ८२ शो!

जगप्रसिद्ध के-पॉप बँड बीटीएसचे सातही सदस्य- आरएम, जिन, सुगा, जे होप, जिमिन, व्ही आणि जंग कुक हे जवळपास चार वर्षांच्या खंडानंतर 21 मार्च रोजी सोलच्या ग्वानहवामुन चौकात एकत्र आले. त्यांनी 'बीटीएस दी कमबॅक लाईव्ह अरिरांग' या भव्य मोफत कॉन्सर्टने...
Skip to content