Homeन्यूज अँड व्ह्यूजकरा योग, व्हा...

करा योग, व्हा रोगमुक्त!

जागतिक योग दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने योग सर्वांसाठी, या पुस्तकाची माहिती देत आहोत. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची रचना वापरायला सोपी अशी वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य व योगसाधनेच्या इतर बाबींचाही यात विचार करण्यात आला आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वांनाच योगासने करणे शक्य व्हावे यासाठी उपकरणांची वा इतर वस्तूंची मदत कशी घ्यावी, यावर पुस्तकात दिलेला भर! या पुस्तकाचा लाभ व्याधिग्रस्त किंवा धडधाकट स्त्री, पुरुष, मुले सर्वांनाच होणार आहे. या पुस्तकात सात विभाग आहेत.‌

योगाचार्य अय्यंगार लिहितात- सुरुवातीस मी जेव्हा योगासने शिकवीत असे तेव्हा माझ्या लक्षात येई की, मी त्यांना जे काही करण्यास सांगत आहे ते त्यांना जमत नाही आणि ते जमत नाही म्हणून एक तर जो नेमका परिणाम व्हायला हवा तो होत नाही. उलट ते कुठे तरी चुकत आहेत आणि त्या सदोषतेमुळेही त्यांना त्रास होत आहे. अशा चुका व त्रास टाळण्यासाठी मी त्यांना आधार दिल्यावर त्यांच्यात खूपच फरक पडतोय हे माझ्या लक्षात आल्यावर त्या आधार देण्याच्या पद्धतीत नेमकेपणा येऊ लागला. रोग्यांना नेमका काय त्रास होतोय, त्यांचा आजार कोणता आहे, त्यांच्या शरीराची ठेवण कशी आहे, त्यांच्या योगासने करण्याच्या पद्धतीत कोणते दोष वा त्रुटी राहत आहेत आणि त्यासाठी मी त्यांना एखादे आसन नेमके कसे करण्यास भाग पाडावे म्हणजे त्यांना बरे वाटेल हा ऊहापोह माझ्या मनात सतत चालू असे. मन या विचारमंथनात कायम गुंतलेले असे. तेव्हा त्यांच्यासाठी काही उपाय शोधण्याची गरज मला भासू लागली. त्यातून काही उपकरणांचा वापर करावा लागला.

पुस्तकाची रचना व त्यासंबंधी सूचना

‘योग सर्वांसाठी’ या पुस्तकाची उपयुक्तता प्रामुख्याने व्यवहार्य अशी आहे. योगाभ्यास प्रत्यक्षरीत्या आचरणात आणून त्याचा परिणाम साधायचा हा त्यामागील उद्देश होय. यातील प्रत्येक प्रकरण हे व्याधींवर उपचार कशा पद्धतीने करायचे हा दृष्टिकोन समोर ठेवून लिहिले आहे. प्रकरणांची विभागणी सर्वांना परिचित असलेली बाह्यांगे लक्षात घेऊन केलेली आहे. लहान मुलांना ज्याप्रमाणे बाह्य शरीराची ओळख ठोकळ मानाने हात, पाय, पोट, पाठ, छाती, डोके अशा पद्धतीने करून दिली जाते त्याप्रमाणे सर्वसामान्यांनादेखील दुखण्याची ओळख ही बाह्यांगातूनच होत असते. तेव्हा हे विभाग म्हणजे हात, पाय, पाठ, पोट (पचनसंस्था), शीर, छाती (श्वसनसंस्था) असे केलेले आहेत. हात हा प्रमुख बाह्यावयव असला तरी हाताशी संबंधित मान, खांदा, काख, कोपर, मनगट, तळहात, बोटे या सर्व भागांच्या दुखण्यावर त्या-त्या प्रकरणात उपाय सुचविला आहे. त्याचप्रमाणे पाय या विभागात मांडीचा सांधा, अडसंधी, गुडघा, घोटा, तळपाय, टाच, पावलाची बोटे; पाठ या विभागात पाठ व कंबर, पचनसंस्था या विभागात पोट; शीर या विभागात डोके, डोळे, कपाळ आणि श्वसनसंस्था या विभागात छाती यांच्याशी संबंधित आजारांवर उपाय सुचविले आहेत. त्यामुळे वाचकांना ज्या भागात दुखणे असेल त्या भागावरील प्रकरणे वाचताना नेमके काय होतेय व काय केले पाहिजे हे लक्षात येईल व मार्गदर्शन लाभेल. प्रत्येक प्रकरणात उल्लेखिलेल्या त्या-त्या आसनांची नावे, चित्र, कृती व परिणाम यांची माहिती मिळेल.

पुस्तक वापरण्यास सोपे जावे या दृष्टीने पुस्तकाच्या शेवटी दोन परिशिष्टे दिली आहेत. परिशिष्ट- १ मध्ये आसन क्रमांक व आसनांची नावे देताना त्यांचे वर्गीकरण केलेले आहे. हे वर्गीकरण म्हणजे उत्तिष्ठ (उभ्या स्थितीतील), उपविष्ट (बैठ्या स्थितीतील), उपाश्रयी (टेकलेल्या स्थितीतील), सुप्त (निजलेल्या स्थितीतील), पश्चिम प्रतन (पुढे वाकलेल्या स्थितीतील), अधोमुख (पालथ्या स्थितीतील), परिवृत्त (वळविलेल्या स्थितीतील), पूर्व प्रतन (मागे वाकलेल्या स्थितीतील), विपरीत (उलट स्थितीतील) असे आहेत. ज्या-ज्या वेळी एखाद्या आजारावर अमुक वर्गातील आसने पूर्ण वर्ज्य करा असे सांगितले आहे, त्या-त्या वेळी या वर्गीकरणावर दृष्टिक्षेप टाकला असता नेमके काय वर्ज्य करावे हे तर लक्षात येईलच; पुन्हा त्या-त्या वर्गातील आसने उपयुक्त असून ती करावीत असा उल्लेख असल्यास त्यांचा समावेश सरावात करता येईल. आसनांची नावे लक्षात राहावीत यासाठी त्यांचे पाठांतरही सहज करता येईल. कोणत्याही प्रकरणात आसनांचा केवळ नामोल्लेख असेल तर त्या आसनांची कृती कोणत्या प्रकरणात आहे हे या परिशिष्टावरून लक्षात येईल.

योग

परिशिष्ट- २ मध्ये एखाद्या आजारावर आसन-संचाची निवड कशी करावी याचा संदर्भ मिळेल. आसनांची नावे आसनक्रमानुसार दिलेली आहेत. तेव्हा ही आसने क्रमवार पद्धतीनेच अनुसरायची आहेत. या परिशिष्टातदेखील तीन स्तंभ-सूची असून त्यांचा उल्लेख टप्पा १, टप्पा २ व टप्पा ३ असा केलेला आहे. तेव्हा नवशिक्यांना आपल्या आजारानुसार सुरुवातीस टप्पा १ मधील आसने कमीतकमी सहा महिने करून मग टप्पा २ मधील आसनांचा समावेश पहिल्या टप्प्यात करून त्याच क्रमवार पद्धतीने ती करायची आहेत. टप्पा ३ मधील आसनांचा समावेश पुढील सहा महिन्यांनी टप्पा १ व टप्पा २ यांत करून रीतसर सराव करायचा आहे. यामुळे सराव हळुहळू कसा वाढवावा व एखाद्या आसनाचा समावेश नेमका केव्हा व कुठे करावा हेही लक्षात येईल.

या व्यावहारिक (प्रॅक्टिकल) पुस्तकाचा योग्य व अचूक असा वापर करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

योग सर्वांसाठी

लेखक: बी. के. एस. अय्यंगार

मूल्य- ३५० ₹. / पृष्ठे- ३२२

सवलतमूल्य- ३२० ₹.

कुरिअर खर्च- ५० ₹. एकूण ३७० ₹. मध्ये घरपोच

योग

पुस्तक खरेदीसाठी संपर्क- ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)

  • Explore tags ⟶
  • Yoga

Continue reading

अशी आहे रा. स्व. संघाची शतकी वाटचाल

संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०:...

.. आणि दिवाळी अंकाबाबत झालेली चर्चा फक्त चर्चाच राहिली!

परवा ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता मोबाईल वाजला. दचकून जागा झालो आणि फोनवरचे बोलणे ऐकल्यावर कानावर विश्वासच बसला नाही. माझा परममित्र आणि ग्रंथ संवाद डिजिटल साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक जितेंद्र जैन तथा पप्पू याचे निधन झाले होते. दोनच दिवसांपूर्वी माझे...

वाचनीय, चिंतनीय व संग्राह्य असे ‘मृत्युंजय भारत’!

'मृत्युंजय भारत' या पुस्तकाचा  प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला.‌ हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह, सुरेश जोशी उपाख्य 'भैयाजी' जोशी यांनी विविध प्रसंगी दिलेल्या ११ व्याख्यानांचे संकलन आहे. व्याख्यानांचे विषय- १) राष्ट्रीय...
Skip to content